yuva MAharashtra बॉलिवूडचा 'ही-मॅन' हरपला! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

बॉलिवूडचा 'ही-मॅन' हरपला! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

Admin
0


 

द जनसत्ता न्यूज 

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय. वयाच्या 89 व्या वर्षी बॉलिवूडच्या 'ही-मॅन'नं जगाचा अखेरचा निरोप घेतला. तब्बल सहा दशकं बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. काही काळ त्यांना व्हेंटिलेटवरही ठेवण्यात आलेलं. पण, अखेर त्यांच्या निधनाची वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या मृत्यूनं सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 


ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. सरुवातीला उपचारांना ते प्रतिसाद देत होते. पण, नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक होती. त्यामुळे त्यांना ICU मधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलेलं. धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत, असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिलेलं. पण अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. 

धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल यांसारख्या स्टार्सनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतलेली. तब्बल सहा दशकं हिंदी सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली.   


*1981 मध्ये विजयता फिल्म*

1981 मध्ये, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगात आपले पाय अधिक मजबूत करण्यासाठी 'विजयता फिल्म्स' हे त्यांचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. 'विजयता फिल्म्स'च्या माध्यमातून, धर्मेंद्र यांनी सर्वात आधी त्यांची दोन्ही मुलं, सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये आणलं. यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटांमध्ये संधी दिली, त्यांचा नातू करण देओल याची प्रेक्षकांना ओळख करून दिली. 

धर्मेंद्र यांनी त्यांच्या 6 दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2012 मध्ये त्याला पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'फूल और पत्थर', 'सीता और गीता', 'शोले', 'धरमवीर', 'आंखे', 'राजा जानी',," 'गुलामी', 'प्रतिज्ञा', 'नये जमाना', ' बर्निंग ट्रेन' आणि 'यादों की बारात' यासह अनेक हिट चित्रपट दिले. या चित्रपटांनी त्यांना केवळ एक प्रमुख अभिनेता म्हणून स्थापित केलं नाही तर प्रेक्षकांवर कायमची छाप सोडली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top