द जनसत्ता न्यूज
जालिंदर शिंदे
घाटनांद्रे/वार्ताहर :- चिदंबरदास गुरु गोविंद महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व हाजारो भविकभक्तांच्या उपस्थित तसेच 'जय शिवचिदंबर,जय शिवचिदंबर' च्या गजरात कमंडलू नदीलगत आसणार्या श्री क्षेत्र शिवचिदंबर महास्वामी मंदीरात श्री चिदंबर महास्वामी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अगदी पहाटे पासूनच मोठ्या भक्तीमय वातावरणात मंदिर परिसरात या सोहळ्याची लगबग दिसून येत होते.या सोहळ्यानिमीत सकाळी १० ते १२ यावेळेत समाजप्रबोधनकार हभप सौ सोनालीताई भिंताडे (कुची ) यांचे दृतकाव्य असे किर्तन पार पडले.त्यांनी आपल्या किर्तन सेवेत समाजातील विषमतेवर चांगलेच बोट ठेवले.त्याला उपस्थितांनी मोठी दाद दिली.
तर दुपारी बारा वाजता अभंग,महाआरती,पुष्पवृष्टी व पाळणा गाऊन जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सांगता ही महाप्रसाद वाटपसह करण्यात आली.संपूर्ण सोहळ्याचे संयोजन हे चिदंबरदास गुरु गोविंद महाराज व तमाम भाविक भक्तांनी केले.
(कवठेमहंकाळ येथील श्री चिदंबरदास महास्वामी मंदीरात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत 'श्री' चा जन्मोत्सव सोहळा पार पडला.फोटो- जालिंदर शिंदे.)
