सिना नदीकाठची करुण कहाणी...
शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू, मुक्या जनावरांचा हंबरडा, हे दृश्य हृदयाला पिळवटून टाकणारं आहे. अनेकांनी पाहिलं, ऐकलं... पण बहुतांश ठिकाणी केवळ कोरड्या सहानुभूतीचं पांघरूणच पसरलं गेलं.
पण आज खरी मायेची सावली उभी राहिली आहे. सिना नदीकाठच्या शेतकरी आणि जनावरांसाठी ५० वाहने भरून चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली असून, हा चारा मोहोळ आणि माढा तालुक्यातील अनेक गावांपर्यंत पोहोचवला जात आहे.
भोयरे, आष्टे, पोफळे, साबळेवाडी, कोळेगाव (येळेवस्ती, काळेवस्ती), वडवळ, रामहिंगणी, नांदगाव, तसेच उंदरगाव, केवड, कुंभेज, खैराव, नायकुडे वस्ती या भागांमध्ये ही जीवनदायी मदत पोहोचेल.
या उपक्रमात संदीप आबा गिड्डे पाटील, माऊली हळणवर आणि मल्हार कोळेकर यांनी जबाबदारी स्वीकारून चाऱ्याची व्यवस्था केली आहे. पंढरपूर येथून निघालेल्या ४५ गाड्या आज राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री माननीय श्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत रवाना झाल्या.
ही केवळ चाऱ्याची वाहतूक नव्हे, ही आहे शेतकरी आणि जनावरांच्या वेदनांना दिलासा देणारी संवेदनशीलतेची यात्रा

