द जनसत्ता न्यूज
कवठेमहांकाळ/ प्रतिनिधी
हरोली मधील युवकांची ऊस तोडणी कामगार व त्यांच्या लहान मुलानं समवेत दिवाळी.
हरोली (ता.कवठेमंहाकाळ )मधील युवकांनी हिंदू सणामधील महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी तो प्रत्येक गोरगरिबांच्या घरात साजरा झाला पाहिजे.प्रकाशाच्या उत्सव म्हणून अवघा देश दीपोत्सवाचा आनंद लुटत आहे.हे असले तरी दुसरी एक बाजू जे ज्यांचं पोट हातावर आहे परगावी जाऊन काम करावे लागते शेकडो किलोमीटर प्रवास करून गावाबाहेर खोपा करून राहत असतात. आनंदाची प्रकाश किरणे त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे याची जाणीव ठेवून ऊस तोडणी मजूर व त्यांच्या लहान चिमुकल्या मुलांना हरोली मधील युवकांनी दिवाळी फराळ, चिवडा, लाडू, चकली, करंजी, खाजा,
उठणे, साबण यासारख्या वस्तूं कुटुंबापर्यंत पोचवून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या सनांदुसाला घरदार सोडून ऊन वारा न पाहता शेकडो किलोमीटर प्रवास करून ऊस तोडणी साठी दोन-तीन जिल्ह्या लांब ऊसतोड मजूर येत असतात.त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून हा उपक्रम लक्ष्मीपूजन दिवशी सकाळी हा उपक्रम राबविला.
यावेळी हिंदुत्ववादी श्री केदार कुलकर्णी बोलताना म्हणाले ज्या ज्या गावात ऊस तोडणीसाठी आलेले पर जिल्ह्यातील गरीब कुटुंबे यांना त्या त्या गावातील युवकांनी, तरुण मंडळांनी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करावी अशे आव्हान त्यांनी केले. या उपक्रमाला श्री केदार कुलकर्णी, श्री रुपेश सुर्वे, श्री.महेश यादव, श्री. सुरज जाधव, श्री.प्रदीप शेंडे, श्री.अजय सुर्वे, तिरमलवाडी चे श्री.तुकाराम गुरव, श्री. सुखदेव गुरव, श्री.निलेश शेंडे, श्री.भानुदास भोसले ह्या सर्वांनी मिळून उपक्रम राबविला. ऊसतोड कामगारांनी आभार मानले.

