द जनसत्ता न्यूज
कवठेमहांकाळ
दिवाळीचा मंगलमय ,सणानिमित्त सांगली जिल्ह्यातील ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील भाजपा सांगली जिल्हा चिटणीस सुभाष शेठ खांडेकर व प्रसिद्ध उद्योगपती संभाजी शेठ खांडेकर यांनी अनमोल भेट देऊन गोरगरिबांच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे. गोरगरिबांना दिवाळी बोनस आणि जीवनोपयोगी किराणा किट वाटप करण्यात आले.
ढालगाव येथील एक अभ्यासू नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, ते प्रसिद्ध उद्योगपती संभाजी शेठ खांडेकर यांच्या कर्तुत्वाने व दातृत्वा ने या भागाला खंबीर असे नेतृत्व करणारा नेता लाभला. असे उदगार ढालगाव मधील गोरगरिब जनतेने बोलताना व्यक्त केले.
कोरोनाच्या महामारीत गोरगरीब जनतेच्या पाठीशी वडील बंधू सारखा हा नेता आपल्या सोबत राहिला, यामुळे कोरोनावरही आपण मात केली, संभाजी शेठ खांडेकर यांच्या सारखा नेता खर तर गावोगावी लाभला पाहिजे, घेण्यासाठी अनेक असतात.देणाऱ्याचे दातृत्व आमच्या सारख्या नव्या पिढीला प्रेरणादायी आहे,आज त्यांनी आपल्या मित्र परिवाराच्या दिवाळी सणात देखील दातृत्व रूपातून सहकार्य केल्याची चर्चा ढालगाव गटात सुरू आहे
यावेळी एक मात्र नक्की उपस्थितांना दिसून आले की,दिव्यांचा प्रकाश तर सगळीकडे होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल आनंदाचं तेज हीच खरी दिवाळी होती. त्या हास्याने मन उजळलं, आणि जाणवलं दिवाळी फक्त दिव्यांची नाही, ती माणुसकीच्या प्रकाशाचीही आहे.
यावेळी बोलताना भाजपा चिटणीस सुभाष शेठ खांडेकर म्हणाले की,प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धीचा प्रकाश नांदो, हीच अंतःकरणातून निघालेली प्रार्थना दिवाळी म्हणजे केवळ सण नव्हे हृदयाला स्पर्शन जाणारी माणुसकीची अनुभूती आहे !
आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहे व राहीन
यावेळी बोलताना संभाजी शेठ म्हणाले की दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी पालावर दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. खरंच, ज्यांना कोणी नाही, अशा गरजू, वंचित आणि निराधार लोकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा हा एकमेव नेता आहे. जमिनीशी नाळ असलेला, लोकांच्या भावना जाणणारा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणारा नेता म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब.राज्यात अनेक नेते आहेत, पण असा माणुसकीने ओतप्रोत भरलेला नेता पुन्हा होणे कठीणच. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर लोकांच्या मनात एवढं स्थान मिळवणारा नेता म्हणजे फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर !
यावेळी उपस्थित
संभाजी खांडेकर,युवा नेते अजित कोळेकर, काकासो घागरे, वरिष्ठ शिक्षक वाय बी कोळेकर सर, वसंत गुरुजी, पै. शुभम कोळेकर, प्रवीण राऊत, आकाश ढोबले, मार्तंड दुधाळ -दुधेभावी इत्यादी व ढालगाव परिसरातील जनता व गोर गरीब मोठ्या संख्येने उपस्थित होते

