द जनसत्ता न्यूज
कवठेमहांकाळ/प्रतिनिधी
कवठेमहाकांळ तालुक्यातील मळणगांव पंचायत समिती गणासाठी बोरगांव चे उपसरपंच व संजय काका गटाचे सुजित पाटील इच्छुक उमेदवार असल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे. या साठी बोरगांवचे युवा वर्ग एकमुखाने सांगली जिल्ह्य़ाचे माजी खासदार संजय काका पाटील व कवठेमहाकांळ-तासगांव मतदारसंघाचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील याच्या कडे साकडे घालण्यात येणार असल्याचे समजते.
याबाबत सविस्तर अधिक माहिती अशी की स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत पण पक्ष श्रेष्ठी कुणाच्या गळ्यात माळ घालणार हे मात्र आजून गुलदस्त्यात आहे.
मळणगांव पंचायत समिती गणातून विविध पक्षाचे असंख्य उमेदवार आपणच निवडून कसे येणार या वल्गना करताना दिसत आहेत.
याबाबत कवठेमहाकांळ तालुक्याची आध्यात्मिक राजधानी असलेले व तालुक्यातील असंख्य वरिष्ठ नेते मंडळीचे राजकीय माहेर घर असलेले बोरगांव चे स्थानिक नेते मंडळी पाठिमागे कशे राहतील. यातूनच बोरगांव चे उपसरपंच व संजय काका गटाचे काका व बाबा चे खंदे समर्थक सुजित पाटील मळणगांव पंचायत समिती गणासाठी इच्छुक असल्याचे समजते.यातून बोरगांव चा युवा वर्ग एकमुखाने सुजित पाटील याच्या नावासाठी जोर धरत असल्याचे समजते.
सुजित पाटील हे गेल्या दोन टर्म पासून बोरगांव चे नेतृत्व करत असल्याने मळणगांव पंचायत समिती गणातून त्याच्या भरपूर ओळख निर्माण झाल्या असून बोरगांव ग्रामपंचायतीमधून केलेल्या विकास कामाची पोहच पावती म्हणून बोरगांवचे असंख्य युवा वर्ग,जेष्ठ नागरिक, स्थानिक पातळीवर नेते मंडळीचे भक्कम पाठिंबा सुजित पाटील याच्या पाठीशी ठाम असल्याचे समजते.
याच जोरावर सुजित पाटील याच्या नावासाठी बोरगांवचे सुजित पाटील समर्थक संजय काका पाटील व प्रभाकर बाबा पाटील याच्या कडे साकडे घालणार असल्याचे समजते व सुजित पाटील याच्या नावासाठी बोरगांवच्या राजकीय पातळीवरून जोरदार हलचाली व मोर्चे बांधणी सुरू असल्याचे समजते.
