द जनसत्ता न्यूज
कवठेमहांकाळ
देशिंग येथे आज दिनांक १४/१०/२०२५ रोजी मनुवादी प्रवृत्तीचा राकेश किशोर यांनी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई सर यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा आणि अनिल मिश्रा याने बाबासाहेबांवर आणि संविधानावर केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याच्या कारणाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने राकेश किशोर या वकिलावर देशद्रोहाचा गून्हा दाखल करण्यात यावा तसेच याप्रवृत्तीच्या समाज कंटकांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी पंचशील नगर देशिंग येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वच पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सामील झाले होते. राकेश किशोर या वकिलाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, भारतीय संविधानाचा विजय असो, राज्यघटनेचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
निषेध व्यक्त करण्यासाठी सरपंच प्रवीण पवार, माजी सरपंच अप्पासो कोळेकर, झुंजार मंडळाचे अध्यक्ष राहुल चंदनशिवे,ग्रामपंचायत सदस्य साधना चंदनशिवे,अशोक चंदनशिवे,संजीवनी काकडे, पिंटू काकडे,तानाजी चंदनशिवे,अशोक कांबळे,सुभाष चंदनशिवे, तसेच झुंजार कला क्रीडा मंडळ संयुक्त न्यू भीमशक्ती प्रतिष्ठान चे कार्यकर्ते तसेच रमामाता महिला मंडळाच्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या."
