yuva MAharashtra कोल्हापूर विभागीय हॅन्ड बॉल स्पर्धेत श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोली च्या 14 वर्षे मुलींची बाजी

कोल्हापूर विभागीय हॅन्ड बॉल स्पर्धेत श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोली च्या 14 वर्षे मुलींची बाजी

Admin
0


द जनसत्ता न्यूज 

कवठेमहांकाळ/प्रतिनिधी 


 
शासकीय शालेय कोल्हापूर विभागीय हॅन्ड बॉल स्पर्धेत श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोली च्या 14 वर्षे मुलींच्या संघाने सांगली जिल्हा ग्रामीण संघाचे नेतृत्व केले होते. त्या स्पर्धेत सहभागी होऊन तृतीय क्रमांक मिळविला. कु. वैष्णवी वावरे, कु. पुर्वजा वावरे, कु. श्रेया पाटील, कु. संचिता पाटील, कु. समिक्षा पुणेकर, कु. अर्पिता दयाळ, कु. श्रेया नरूटे आदी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांना श्री डी. एस. पाटील, श्री. पी बी लोंढे, श्री सागर पाटील, श्री सोमनाथ अवसरे सर यांनी मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापक श्री संजय आसूदे सर, श्री सतीश भोसले सर यांनी प्रोत्साहन दिले. सर्व शिक्षकांनी कौतुक केले. ज्ञानदान शिक्षण संस्थाचे अध्यक्ष श्रीमंत श्री जयराज बाबा घोरपडे सरकार, सचिव श्री बाळासाहेब भोसले व संचालक मंडळाने विद्यार्थीनींचा सत्कार करून आशिर्वाद दिला. माझा गाव, माझी शाळा, माझा अभिमान...

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top