yuva MAharashtra सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकर भरती म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरणच असे सर्वसामान्याचे मत...युवराज ओलेकर*

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकर भरती म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरणच असे सर्वसामान्याचे मत...युवराज ओलेकर*

Admin
0




द जनसत्ता न्यूज 

कवठेमहांकाळ/प्रतिनिधी 

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी हिताच्या निर्णयाऐवजी विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली महाराष्ट्रात गाजत आहे गावगाड्यांमधील शेतकरी शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाला सहज सुलभ पतपुरवठा करता यावा या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्यात आली पण अलिकडच्या काळात हि बैक राजकारणात सक्रिय असणाऱ्या नेत्यांना सोन्याचं अंडं देणारी कोंबडी वाटू लागली अन् या अंड्यांच्या लालसेपोटी लाखो रुपये खर्चून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व्हायचे मग करोडोंचा भ्रष्टाचार करायचा परत सत्तेतुन पैसा पैसातुन सत्ता हे चक्र सतत चालू ठेवायचं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक कोण आहेत यांचा आपण बारकाईने अभ्यास केला तर असे स्पष्ट होते कि आमदार खासदार किंवा त्यांचे निकटवर्तीय नातेवाईक कारखाना सुतगिरणी यांचे चेअरमन मग या लोकांना शेतकर्रयाबद्दल कळवळा असण्याची गरज नाही त्यांच्या संस्था साखर कारखाने सुत गिरणी यांना नियम बाह्य कर्ज पुरवठा करायचा कर्ज देणारेही तेच अन् घेणारे हे तेच. परत मंत्रालयातुन विविध प्रकारच्या योजना आणायच्या सबसिडी लाटायची हा त्यांचा धंदा तेजीत सुरू आहे हे सगळं कमी होत म्हणूनचं कि काय दर पाच वर्षांनी नोकर भरती प्रक्रिया फक्त कागदावरच राबवायची अन् वीस पंचवीस लाखाला एक जागा असा पद्धतीनें प्रत्येक संचालकने ठराविक जागा वाटून घ्यायच्या आणि करोडोंची माया जमवायची धनदांडग्यांच्या टुकार पोरासाठी हि रोजगार हमीची नवीन स्किमच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जिल्ह्यातील अल्प भूधारक शेतकऱ्यांच पोरगं पाण्याचं दार धरत धरत मोठ्या आशेने अभ्यास करतय त्यांच्या बापाला आईला वाटतंय आमचं पोरगं या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे परिक्षेत यश मिळवलं. त्यांना हे माहित नाही कि नोकर भरती तो बहाणा है पैसा कमाना यही इन लोगो का इरादा है.. या भ्रष्टाचार्याच्या तोंडला लोकशाही मार्गाने मुसक घालण्यसाठी जिल्ह्यातील सर्व बेरोजगार तरुण तरुणींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळ उभी केली पाहिजे पाचशे नव्वद जागांची अत्यंत पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया झाली एम पी एस सी सारख्या संस्थेच्या माध्यमातून हि प्रक्रिया पार पाडावी म्हणून म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हजारो पत्रे ईमेल पाठवून आपल्या भावना व्यक्त करणं गरजेचं आहे तरच आपणांस न्याय मिळू शकेल..

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top