yuva MAharashtra १९५८ च्या दिल्ली दौऱ्यातील कलाकार पडद्याआड

१९५८ च्या दिल्ली दौऱ्यातील कलाकार पडद्याआड

Admin
0


 

जनसत्ता न्यूज 

कवठेमहांकाळ . 


         यशवंत कोळेकरांच्या जाण्याने ऐतिहासिक आठवणीना उजाळा


बिरुदेवनगरी आरेवाडी येथील ज्येष्ठ गजनृत्य कलाकार यशवंत बाळू कोळेकर यांचे काल वयाच्या ९२ व्या वर्षी देहावसन झाले. आरेवाडीच्या सांस्कृितक इतिहासातील सोनेरी पान असलेल्या सन १९५८ च्या दिल्ली दौऱ्यातील सहभागी कलाकारांपैकी हयात असलेले ते शेवटचे कलाकार ठरले. 


       यशवंत कोळेकर हे नव्वदी पार केलेले आरेवाडी गावातील एक जेष्ठ व्यक्तीमत्व. त्यांनी आयुष्यभर शेती व पशुपालन करत काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला. त्यांना लहानपणापासून गजनृत्य कलेची आवड होती. त्यामुळे सन ६७ वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक दिल्ली दौऱ्यात त्यांना कला सादर करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी गेलेल्या २५ कलाकारांमधील हयात असलेले ते एकमेव कलाकार होते. 


       यशवंत कोळेकर हे तत्त्वनिष्ठ व शांत स्वभावाचे होते. काही अडचणीमुळे ते काहीसे कला सादरीकरणापासून दुरावले होते. पण ऐन उमेदीच्या काळात त्यांनी १९५८ चा दौरा मात्र गाजविला होता. त्यावेळी यशवंत कोळेकर यांचा भारताचे प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांनी सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला होता. तसेच तत्कालीन राष्ट्रपती राजेद्र प्रसाद यांनी देखील आरेवाडीच्या कलाकारांचे कौतुक केले होते. 


       असे हे यशवंत कोळेकर आज या जगात नाहीत. पण त्यांच्या अनेक आठवणी आजही मागे राहिल्या आहेत. वास्तविक पाहता त्यांना खास बाब म्हणून कलाकार मानधन सुरू होणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तरी देखील आता त्यांच्या पत्नीस कलाकार मानधनाचा लाभ मिळाल्यास त्यांच्या कलेचा सन्मान ठरेल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top