yuva MAharashtra बोरगांव येथे बौद्ध समाजाचा वर्षाव समापन सोहळा व धम्म मेळावा यशवस्वीरित्या संपन्न*

बोरगांव येथे बौद्ध समाजाचा वर्षाव समापन सोहळा व धम्म मेळावा यशवस्वीरित्या संपन्न*

Admin
0


जनसत्ता न्यूज 

कवठेमहांकाळ 


  कवठेमहाकांळ तालुक्यातील बोरगाव येथे रविवार दि.५ ऑक्टोबर २०२५ रोजी कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव गावातील पंचशीलनगर येथील बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा सलग ३ महिने वर्षावास कार्यक्रम सुरु होता, यादरम्यान दररोज सकाळी त्रिसरण व पंचशील, बुद्ध वंदना तसेच भगवान गौतम बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथाचे अविरतपणे वाचन सुरू होते. या वर्षावासाचा सांगता समारंभ व धम्म मेळावा सांगली जिल्ह्यातील बुद्ध अनुयायांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाची सुरुवात बुद्धम् सरणम् गच्छामीच्या जयघोषामध्ये प्रमुख मान्यवरांच्या व पंचशील नगर मधील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत मुख्य मार्गावरुन पदयात्रेद्वारे मुख्य धम्मपीठाकडे प्रस्थान करण्यात आले.

   त्यानंतर उद्योगपती सीआर सांगलीकर यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

   त्यानंतर स्वागताध्यक्ष आयु सीताराम माने (माजी सैनिक) यांनी व आयोजकांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. नीळकंठ माने यांनी केले

    या सांगता समारोप साठी मुख्य मार्गदर्शन व आशीर्वाद पूज्य भंते डॉ.यशकाश्यपायन, विशेष मार्गदर्शन धम्मभूमी गुगवाडचे संस्थापक, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक उद्योगपती सी. आर. सांगलीकर यांनी केले. 

  या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले धम्म प्रचारक व पालीभाषा अभ्यासक प्रा.डॉ.सुगंध वाघमारे यांनी धम्म समजून घेताना या विषयावर मार्गदर्शन केले,

भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष व धम्म प्रचारक आयु.जितेंद्र कोलप यांनी भगवान बुद्धांचे धम्मनगर या विषयावर मार्गदर्शन केले, 

धम्म प्रचारक व पालीभाषा अभ्यासक आयु.दयानंद कांबळे, यांनी बहुजनांच्या ९ देवी या विषयावर मार्गदर्शन केले आणि 

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हाध्यक्ष आयु.रतन तोडकर यांनी धम्म आणि आपण या विषयावर मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कोषाध्यक्ष श्रावस्ती बुद्ध विहार सांगली आयु.संभाजी माने यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी अतुल माने यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन आयु.सतीश गाडे यांनी केले

अशा रीतीने हा धम्म मेळावा उत्साहात आनंदात यशस्वीरित्या संपन्न झाला

या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक चळवळीमध्ये तसेच धम्म चळवळीमध्ये सक्रिय असणारे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

बुद्ध शिव-फुले-शाहू आंबेडकरी विचारधारेच्या पुस्तकांचा स्टॉल यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. बऱ्याच जणांनी पुस्तकांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली

पंचशील नगर येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते. या कार्यक्रमाबाबत सर्वांनी त्यांचे कौतुक केले.

  या बौद्ध समाज्याच्या कार्यक्रमास आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी ,ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी , विविध क्षेत्रातील मान्यवर, मराठा समाजातील बांधव ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top