द जनसत्ता न्यूज
जालिंदर शिंदे
घाटनांद्रे/वार्ताहर :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकळ) येथील सर्वोदय विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक स्व सुबराव गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयाच्या वतीने शाळेतील सर्व म्हणजे सुमारे सहाशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थी,शिक्षक,पालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कुटुंब हे सावळज (ता तासगांव) येथील असुन,त्यानी या शाळेचा ऋणानुबंध आजही कायम ठेवला आहे.यापुर्वीही या कुटुंबाच्या वतीने शाळेस ऑफिससाठी लागणार्या सर्व खुर्ची दिल्या होत्या.
यावेळी बोलताना स्व सुबराव पाटील यांचे पुतणे प्रकाश पाटील म्हणाले की आमच्या कुटुंबाच्या उत्कर्षात या सर्वोदय विद्यालयाचा सिंहांचा वाट असल्याने,या शाळेच्या ऋणात कायम रहावे असे वाटते.त्यातुनच हातुन ही थोडीफार उतराई होते.यावेळी मुख्याध्यापक बी एस शिंदे यांनीही तात्कालीन आपले सहकारी मित्र स्व सुबराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी मुख्याध्यापक बी एस शिंदे,स्व सुबराव पाटील कुटुंबीय प्रकाश पाटील,नानासो पाटील,अतिष पाटील,शिक्षक सर्वश्री साधना धेंडे-कांबळे,प्रकाश वाघमोडे, लक्ष्मण लवटे,जयसिंग बोबडे, भारत काळे,दिलीप खाडे, जयानंद स्वामी,शोभा पाटील, सचिन पाटील,साहील पवारसह विद्यार्थी पालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
