द जनसत्ता न्यूज
जालिंदर शिंदे
3/10/2025
घाटनांद्रे वार्ताहर :- 'आई उदं ग आई उदं' च्या गजरात व सुवाद्यासह भव्यदिव्य अश्या पालखी मिरवणूकेने विजयादशमी अर्थात दसर्या दिवशी घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे सीमोल्लंघन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती.पालखी समोर खानापूर येथील जगजोगत्याचा बहारदार अश्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.परंपरेप्रमाणे सुतार वाड्यातून पालखी मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली.तदनंतर गावातील प्रमुख मार्गावरून फिरत गावातील प्रत्येक मंदिरासमोर सोने वाटप करत,करत पालखी पुजार्याच्या घरासमोर आली.तिथे पुज अर्चा करून,मानापानचा कार्यक्रम होऊन गावापासून एक किलोमीटर ओढ्यालगत आसणार्या श्री यल्लम्मा देवीच्या मंदिराला पालखी प्रदक्षिणा घालून व आपट्याची पाने वाटण्यात आली व कार्यक्रमांची सागता करण्यात आली.
