जनसत्ता न्यूज
जालिंदर शिंदे
घाटनांद्रे/वार्ताहर :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील ग्राम सर्व सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ही श्री हनुमान मंदीरात चांगली खेळीमेळीत पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रल्हाद (आण्णा) शिंदे होते.यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.तदनंतर सचिव आशिष शिंदे यांनी मागील आवाहल वाचन केला.यामध्ये संस्थेची आर्थिक स्थिती,सामाजिक उपक्रम,पुढील वर्षाच्या नियोजना बाबत विषय आले.यावर सर्वानुमते चर्चा करण्यात आली.
यावेळी संस्थेचे चेअरमन प्रल्हाद (आण्णा) शिंदे अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले की आपली संस्था चालू वर्षी 'ब' वर्गात आली असून, सभासदांकडूनही शंभर टक्के वसुली आल्याचे सांगितले. तदनंतर कर्ज वितरणही सभासदांना चांगल्याप्रकारे दिल्याचे सांगून यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांना त्यांनी साधक वादक उत्तरे दिली.
तर गावात दोन सोसायट्या,दोन पतसंस्था,वीस-एकवीस बचत गट,एक हायस्कूल,तीन जिप शाळा,पवन ऊर्जा प्रकल्पाचे मोठे ऑफिस,मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादक शेतकरी असुनही गावात जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा नसल्याने ग्रामस्थांचा मोठा खोळंबा होत आहे तर तात्काळ गावात जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा व्हावी असा एकमताने ठराव करण्यात आला.
यावेळी चेअरमन प्रल्हाद शिंदे,व्हा चेअरमन उमराव शिंदे, सचिव आशिष शिंदे,पोलिस पाटील महादेव उर्फ एकनाथ शिंदे,संचालक सर्वश्री मानसिंग झांबरे,मारुती शिंदे,तुकाराम शिंदे,रमेश पाटील,महादेव नाथा शिंदे,जालिंदर चव्हाण,तज्ञ संचालक बापूसाहेब शिंदे व विजय शिंदे सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत प्रल्हाद शिंदे यांनी तर आभार मानसिंग झांबरे यांनी मानले.
(फोटो ओळी :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकळ) येथील ग्राम विकास सोसायटीच्या सभेत बोलताना चेअरमन प्रल्हाद (आण्णा) शिंदे.फोटो-जालिंदर शिंदे.)
