जनसत्ता न्यूज
कवठेमहांकाळ/प्रतिनिधी
29/9/2025
कवठेमहाकांळ तालुक्यातील बोरगांव येथील जय हिंद मित्र मंडळाने नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून भरविले रक्तदान शिबीर
सामाजिक आरोग्याचे भान राखत व गरजूंना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी डाॅक्टर महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगांव येथील जयहिंद मित्र मंडळाने दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी एकदिवसीय रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते .
या रक्तदान शिबीरात मंडळाचे कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने रक्तदान करतात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले असून महिला रक्तदात्याची संख्या ही विशेष लक्षणीय होती.
जय हिंद मित्र मंडळ हे गेल्या चार ते पाच वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करत असून यात रक्तदात्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक वर्षी मिळत असल्याचे डाॅक्टर महेश पाटील यांनी सांगितले.
रक्तदात्यांनी केलेले रक्तदान हे हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड सेंटर सांगली यांच्या कडे पाठविण्यात आले आहे.
रक्तदान शिबीरात सहभाग घेतलेल्या रक्तदात्याना मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र व आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या आहेत.
या रक्तदान शिबीरास अध्यक्ष संदीप जाधव,पोपट पाटील,
नितीन & स्मिता पाटील,
माणिक & दीपाली शिंदे,
सुधीर & दीपाली सूर्यवंशी
संगीता माने,सुनिता पाटील,
गायत्री & पोपट मुळीक,
शिवराज माने, विजयकुमार पाटील, सुरज पाटील, युवराज सुर्यवंशी,नंदकुमार & बाबासाहेब पाटील, प्रवीण,आशुतोष,ज्ञानू ,किरण,अतुल पाटील व अनेक मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले...


