yuva MAharashtra कवठेमहांकाळ तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची संदीप गिड्डे पाटील यांनी केली पाहणी

कवठेमहांकाळ तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची संदीप गिड्डे पाटील यांनी केली पाहणी

Admin
0

जनसत्ता न्यूज 

कवठेमहांकाळ 

29/9/2025


कवठेमहांकाळ तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परिसराची आज भाजपा नेते संदीप गिड्डे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी हिंगणगाव येथील हेरवाड–दिघंची राज्यमार्गावरील पावसामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही तपासणी केली. यावेळी परिसरातील नागरिक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. लावंड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


संदीप गिड्डे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितले की, “पुलावरील पाणी ओसरताच तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करावीत.” तसेच या ठिकाणी नव्या पुलासाठी कार्यारंभ आदेश आधीच काढण्यात आल्याची माहिती देत त्यांनी सांगितले की, नदीचे पाणी कमी झाल्यावर मा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन नव्या पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. 

या प्रसंगी संदीप गिड्डे पाटील यांनी स्वतः पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली.

पाहणी दौऱ्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. मिलींद (बापू) कोरे, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन कांबळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष मा. राकेश कोळेकर, तालुका उपाध्यक्ष कुमार जाधव, तालुका सरचिटणीस रवी गाडवे, विठुरायाचीवाडीचे उपसरपंच धनाजी माळी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, ॲड. विजय शेजाळ, अग्रणी विकास सोसायटीचे चेअरमन विक्रम कोळेकर, युवा नेते ओंकार पाटील, युवराज कोठावळे, मनोज देसाई, पंकज पाटील (चिंचणी), विशाल गिड्डे, दत्तात्रय पवार, कुची ग्रामपंचायत सदस्य वैभव सरवदे, गजानन चौगुले, अभय माने, प्रसाद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top