जनसत्ता न्यूज
कवठेमहांकाळ/प्रतिनिधी
देशिंग (ता. कवठे महांकाळ )
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख सहा उत्सवापैकी महत्त्वाचा असलेला एक उत्सव म्हणजे वजयादशमी शस्त्रपूजन. देशिंग मंडल मध्ये हा उत्सव उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री गुंडीबुवा मठाचे मठाधिपती प.पू. आनंदगिरी महाराज व मार्गदर्शक म्हणून श्री धनंजय दीक्षित हे उपस्थित होते. श्री दीक्षित यांनी संघाच्या 100 वर्षातील कार्याचा गौरव केला तसेच संघाचे समाजातील असलेले योगदान याबद्दल माहिती दिली.शंभर वर्षानिमित्त संघ राबवत असलेल्या समरसता, कुटुंब प्रबोधन,पर्यावरण, नागरी शिष्टाचार,आणि स्वदेशी जागर या पंचसूत्री ची सविस्तर माहिती दिली. भारतीयांनी जातीपाती विसरून हिंदूही एकच जात आहे एकच धर्म आहे म्हणून एकत्र यावे. प्रत्येक नागरिकांनी पर्यावरण रक्षण संवर्धन, कुटुंब व्यवस्थापन व स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे या गोष्टींवर श्री धनंजयराव दीक्षित यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शस्त्र पूजन करण्यात आले. शस्त्रपूजन मध्ये प्रामुख्याने ढाल -तलवार, गदा, श्री भगवतगीता,राजा शिवछत्रपती ग्रंथ, भारतीय संविधान याचे पूजन करण्यात आले. तालुका कार्यवाह वैभव सगरे यांनी पाहुण्याचा परिचय, देशिंग मंडळ प्रमुख केदार कुलकर्णी त्यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रम आनंद धर्मे, भीमराव कागवाडे, तुकाराम गुरव, मनोज गुरव, अजिंक्य जोशी, केदार धर्मे, सुरज जाधव यांनी परिश्रम घेतले. यासह तालुक्या मधील स्वयंसेवक, गावातील नागरिक कार्यक्रम ला उपस्थित होते.
