घाटनांद्रे/वार्ताहर:-
जालिंदर शिंदे
सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रीत करून ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध पहिले सशस्त्र क्रांतीचे बंड हे नरवीर उमाजी नाईक यांनी केले व या सतेला सल्लग चौदा वर्षे सळो की पळो करून सोडले होते असे प्रतिपादन एम एम ग्रुपचे प्रदेश सचिव सुहास चव्हाण यांनी घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमा दरम्याने केले अध्यक्षस्थानी सरपंच अमर शिंदे होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की भारतीय इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना घडल्या काहीची नोंद झाली काहींची दखलच घेण्यात आली नाही.परंतू १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले त्यात क्रांतीचे पहिले स्वप्न पाहुन नरवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजा विरुद्ध पहिला उठाव केल्याचे सांगितले.तर अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच अमर शिंदे म्हणाले की एका चांगल्या बदलासाठी उमाजी नाईक इंग्रजा विरुद्ध मोठ्या त्वेषाने लढ्याचे सांगून त्यांना फाशी झाली नसती तर ते दुसरे शिवाजी महाराज झाले असते असे तात्कालीन इतिहासकारांनी लिहून ठेवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी एम एम ग्रुपचे प्रदेश सचिव सुहास चव्हाण,सरपंच अमर शिंदे, तंटामुक्तीचे कुलदीप शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे अभिजित शिंदे,ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे,एम एम ग्रुपचे तालुकाध्यक्ष संदीप मंडले,जिल्हा उपाध्यक्ष सुनील जाधव,तालुका सचिव नितीन मदने,निलेश मदने,अमर मदने,रविंद्र मदने,विशाल मदने,संतोष पाटोळे,प्रविण मलमे,आर्यन मदने,भारत मदने, सौ अश्विनी मदने,सौ रुपाली मलमे,सौ माधवी मदने,सुनिता मदने,दिक्षा मदनेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार नितीन मदने यांनी मानले.कार्यक्रमा नंतर महाप्रसाद वाटप झाले.तर सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून सुवाद्यासह भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
(फोटो ओळी :- १) घाटनांद्रे (ता कवठेमहांकळ) नरवीर उमाजी नाईक जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करतांना सरपंच अमर शिंदे सोबत कुलदीप शिंदे व इतर.२) मार्गदर्शन करताना एम एम ग्रुपचे प्रदेश सचिव सुहास चव्हाण.फोटो- जालिंदर शिंदे.)
