yuva MAharashtra कवठे महांकाळ भाजपाकडून पूरपरिस्थितीची पाहणी

कवठे महांकाळ भाजपाकडून पूरपरिस्थितीची पाहणी

Admin
0


जनसत्ता न्यूज 

कवठे महांकाळ/प्रतिनिधी

                                   28/9/2025

तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून,तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.तालुक्यात ८३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.मुसळधार पावसामुळे खरीप पिकांसह द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून,अग्रणी नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

    तालुक्यातील कोकळे,रांजणी,कुची,जाखापूर,कुंडलापूर,घाटनांद्रे यांसह अनेक गावांमध्ये संततधार पाऊस झाला आहे.मोरगाव,देशिंग,हिंगणगाव,मळणगाव,अग्रण धुळगाव भागात बंधारे आणि पुलांवरून पाणी ओसंडून वाहत आहे.हिंगणगाव येथील मुख्य पूल पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक तात्पुरती पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे.देशिंग-हरोलीदरम्यानचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क काही काळ तुटला होता.शहरातील कमंडलू नदी देखील पात्राबाहेर आल्याने शहरातील नागरिक धास्तावलेले दिसून आले.या अतिवृष्टीने उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील बहुतांशी पूल तसेच प्रमुख रस्त्याचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.

 

 

     या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे.भुईमूग,उडीद,मका, सोयाबीन यांसारख्या नगदी पिकांमध्ये पाणी साचल्याने पिके कुजण्याचा धोका वाढला आहे.पोंगा व फुलोर्‍यात असलेल्या द्राक्षबागांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.आहे.अशातच तालुक्याला जोडणारे रस्ते पूरपरिस्थीतीमुळे बंद किंवा खराब झाल्याने तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

   याच पार्श्वभूमीवर भाजपाचे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले,जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे,जिल्हा कार्यकारणी सदस्य धनंजय शिंदे,विजय सूर्यवंशी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता लावंडे यांची भेट घेऊन पूरग्रस्त भागातील झालेली रस्त्यांची तसेच नाल्यांची दुरावस्था,त्यासंदर्भात करावी लागणारी तात्काळ कार्यवाही तसेच जिथे पूर्ण नुकसान झाले आहे तिथे तात्काळ तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था याबाबत चर्चा केली तसेच तात्काळ उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top