जनसत्ता न्यूज
कवठेमहांकाळ/प्रतिनिधी
28/9/2025
कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यासह तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यात एकूण ८३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील भुईमूग,उडीद, बाजरी व मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कवठेमहांकाळ तालुक्या तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे,वाघोली,गर्जे वाडी,तिसंगी,कुंडलापूर, कुची या गावांसह तालुक्यात शुक्रवार दि.२६ रोजी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शुक्रवार दि.२६ रात्रीपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाची तालुक्यात एकूण ८३.६
मिलिमीटर इतके नोंद झाली आहे.शनिवार दि.२७ च्या माहितीनुसार कुची(७३.५) हिंगणगाव (९०.८) ढा लगाव(७४.८) देशिंग (९०.८) व कवठेमहांकाळ (८८.०) मिलिमीटर इतकी नोंद झाली आहे.या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भुईमूग सुमारे १०० , उडीद ३०, मका ७० ते८० व बाजरी ५० टक्क्यापर्यंत प्रथम दर्शनी नुकसान दिसत आहे.त्याचबरोबर द्राक्ष पिकाची फळ छाटणी झालेल्या
व अद्याप छाटणी न झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे ही नुकसान झाले आहे.त्याचेही पंचनामे करण्यात यावेत,अशी द्राक्ष उत्पादक शेतकरी मागणी करत आहेत.तालुक्यातील शेतकरी सातत्याने अस्मानी संकटामुळे त्रस्त होतो आहे.अजूनही हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस मोठ्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी नुकसान भरपाई च्या प्रतीक्षेत आहेत,त्यातच नव्याने शेतकऱ्यावर अस्मानी संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे

