yuva MAharashtra आरेवाडी येथील दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा : प्रा शिवाजीराव ओलेकर

आरेवाडी येथील दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा : प्रा शिवाजीराव ओलेकर

Admin
0



जनसत्ता न्यूज 

 कवठेमंकाळ 

आरेवाडी (तालुका कवठेमंकाळ) येथील बिरोबा देवाच्या बनामधे मंगळवार दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होणार आहे तरी या मेळाव्यास बहुजन समाजासह,धनगर वंचित उपेक्षित अल्पसंख्याक ओबीसी समाज बांधवांनी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन कवठेमंकाळ येथील बहुजनांचे नेते प्रा.शिवाजीराव ओलेकर सर यांनी केले आहे. या अगोदर दसरा मेळाव्यासाठी दिनांक 28 सप्टेंबर ही तारीख जाहीर करण्यात आली होती परंतु त्याच दिवशी ओबीसी यलगार मेळावा असल्याकारणाने या मेळाव्याची तारीख पुढे ढकलून 30 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेली आहे.




 

 या मेळाव्यासाठी बिरोबा देवस्थान ट्रस्ट, पुजारी मंडळी, अरेवाडी ग्रामपंचायत, पोलीस पाटील तसेच तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते जोरदार तयारी करीत आहेत यावेळी मंदिर परिसरातील साफसफाई व मंडप व्यवस्था करण्यात येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात धनगर व बहुजन बांधव उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी महाराष्ट्रातून मोठया संख्येने बहुजन बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन शिवाजी ओलेकर यांनी केले आहे.यावेळी जत तालुक्याचे नेते भाऊसाहेब दुधाळ, सांगोला तालुक्याचे नेते पांडुरंग लवटे, भोजलिंग बंडगर, स्वप्नील ओलेकर , तानाजी शिंगाडे,बिरू कोळेकर इत्यादी उपस्थित होते.



 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top