yuva MAharashtra कुटकोळी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्र पूजन उत्सव संपन्न

कुटकोळी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्र पूजन उत्सव संपन्न

Admin
0

जनसत्ता न्यूज नेटवर्क 

कवठेमहांकाळ 

27/9/2025

कुटकोळी (ता. …) : दिनांक २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्री मारुती मंदिर येथे शस्त्र पूजन उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडलाचे प्रमुख श्री. प्रशांत देवकते यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून गिरलिंग मठाचे परमपूजनीय बाळ महाराज उपस्थित होते.


यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना श्री. गिरीश जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. संघ स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, संघ या शताब्दी वर्षांमध्ये पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी जागर, सामाजिक समरसता व नागरी शिष्टाचार या पंचसूत्रीवर कार्य करणार आहे.


भर पावसातही स्वयंसेवकांची उपस्थिती लक्षणीय होती. संघ प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top