जनसत्ता न्यूज
कवठेमहांकाळ/ प्रतिनिधी
रांजणी : महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समितीच्यावतीने ओबीसी प्रवर्गातील विश्वकर्मीय समाज जाती-समूहाच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
इतर मागासवर्गीय जातींचे 'अ', 'ब', 'क', 'ड' अशा चार उपवर्गात विभाजन करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी समितीने केली. रोहिणी आयोगाने २०१९ मध्ये अहवाल पूर्ण केला असून तो तातडीने स्वीकारून अंमलात आणावा. मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे ओबीसींना २७ टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला. परंतु आजही ठराविक जातीसमूह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. सर्व समाजोन्नती साठी ओ. बी. सी. समाजाचे वर्ग 1, 2, 3 व 4 ( अ, ब, क, ड) वर्गीकरण व जातिनिहाय जनगणना व्हावी. यासारख्या विविध मागणीसाठी तहसिलदार अर्चना कापसे यांना कवठेमहांकाळ तालुक्याच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानेश्वर सुतार, शिवाजी सुतार चंद्रकांत सुतार योगेश सुतार दशरथ पवार, प्रवीण सुतार, राजू सुतार व इतर समाज बांधव उपस्थित होते
.
