जनसत्ता न्यूज
जालिंदर शिंदे
घाटनांद्रे/वार्ताहर
झुरेवाडी रोड माळी वस्ती येथील एसकेएस योगा हॉल येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय योगा स्पर्धेत ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित घाटे गुरुजी विद्यामंदिर व शेवंताई माध्यमिक विद्यामंदिर शिरढोण (ता कवठेमहांकाळ) च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे.त्यांच्या या यशाचे परिसरातून मोठे कौतुक केले जात आहे.
या शाळेचे *१४ वर्षे वयोगटातील विद्यार्थी* अनुक्रमे,१) आर्टिकल सिंगल:- अथर्व विजयकुमार पाटील - प्रथम क्रमांक.
२) पारंपरिक पियर्स:- श्रीवर्धन गुंडा निकम व सार्थक संभाजी कदम - संयुक्तपणे द्वितीय क्रमांक.
३) आर्टिस्टिक पियर्स:- संस्कार संजय कदम व सोहम बनाजी सोनवणे संयुक्तपणे - प्रथम क्रमांक *
*१४ वर्षे वयोगट मुली*
१) पारंपरिक सिंगल:- वैष्णवी योगेश बुकटे - प्रथम क्रमांक.
२)आर्टिस्टिक पियर्स:- ऋतुजा सुधाकर साळुंखे व पायल प्रमोद पाटील संयुक्तपणे - प्रथम क्रमांक.* *१७ वर्षे वयोगट मुले.*
* १) पारंपरिक सिंगल:- अनवेश योगेश बुवा - प्रथम क्रमांक.
* २) आर्टिस्टिक सिंगल :- अभिषेक प्रकाश वावरे - प्रथम क्रमांक.
* ३) पारंपरिक पियर्स:- शौर्य कृष्णराव भोसले व संकल्प सचिन जाधव संयुक्तपणे प्रथम.
*१७ वर्षे वयोगट -मुली*
१) पारंपरिक सिंगल:- श्रेया प्रशांत चव्हाण - प्रथम क्रमांक.
२) पारंपरिक पियर्स:- सई अजितराव शिंदे व आदिती अनिल पाटील संयुक्तपणे द्वितीय.
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक चंद्रकांत घाटे, खजिनदार सचिन घाटे,सचिव संजय घाटे,संचालिका सौ सुषमा घाटे, विद्यामंदिरचे मुख्याध्यापक काकासाहेब वाघमोडे,शेवंताई माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अशोक माने, क्रिडा शिक्षक प्रमोद बंडगर, योगा शिक्षक विनोद बागुल व पालकांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
(कवठेमहंकाळ येथे तालुकास्तरीय योगा स्पर्धेत आपले कौशल्य दाखवताना शिरढोण (ता कवठेमहांकळ) येथील घाटे गुरुजी विद्यामंदिरचे विद्यार्थी
.)
