सांगली न्यूज
28/72024
आज शनिवार दि. २७/०७/२०२४ रोजी नांगोळे ता. कवठेमहांकाळ येथे शिवसेना कवठेमहांकाळ तालुका उपप्रमुख मा. दिलीप गिड्डे साहेब यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. आदर्श विद्यामंदिर नांगोळे, व जिल्हा परिषद शाळा नांगोळे येथे विद्यार्थी यांना खाऊचे वाटप करण्यात आले, यावेळी बोलताना शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे तालुका अध्यक्ष मा. रामदास सावंत यांनी, सर्वांच्या वतीने माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना महामारीच्या संकटात महाराष्ट्रातील जनतेला वाचविण्यासाठी अगदी आदर्श काम करुन प्रत्येक संकटाना सामोरे जाणारे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून आदर्श घडविला,असे सावंत यांनी सांगितले, खाऊचे वाटप व नियोजन मा. दिलीप गिड्डे यांनी केले.जि. प. शाळा नांगोळे येथे मा. दिलीप गिड्डे व उपस्थितांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी तालुका उपप्रमुख मा. दिलीप गिड्डे, शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे तालुका अध्यक्ष मा. रामदास सावंत, शिवशक्ती वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष मा. सागर शेजाळ, उपजिल्हाप्रमुख मा. एकनाथ पवार, तालुका प्रमुख मा. अजय मोरे, युवानेते गणेश चव्हाण, संभाजी हुबाले, आदर्श विद्यामंदिर नांगोळे मुख्याध्यापक श्री तुकाराम मासाळ, श्री दिलीप सुतार, हनमंत मासाळ, दादासाहेब मासाळ, जाधव मॅडम, जि. प. शाळा मुख्याध्यापक श्री. तानाजी काशीद सर, जानकर सर, माजी सरपंच श्री. अनिल गोंधळे ग्रामस्थ व विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते.