सांगली न्यूज डिजिटल
इरळी गावच्या बहुजन समाज पार्टीच्या सरपंच संजना आठवले यांना विरोधकाकडून जोरदार विरोध होत असून सुद्धा गावांमध्ये कोट्यावधी रुपयांची कामे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये करणाऱ्या संघर्ष वादी सरपंच म्हणून संजना आठवले या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत त्यांच्या माध्यमातून इरळी येथे आमदार फंडातून लक्ष्मण पाटील यांचा वाडा ते शंकर पाटील यांचे घर असा रखडलेल्या काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन शुभारंभ करण्यात आला आहे सरपंच संजना आठवले यावेळी म्हणाल्या की या गावांमध्ये निवडणूक झाली आणि माझी जनरल ठिकाणी सरपंच म्हणून निवड झाली सरपंच म्हणून झालेली निवड बऱ्याच जातीवादी लोकांच्या डोळ्यात खोपली कारण मी एक एस सी कॅटेगिरी मध्ये जन्मलेली महिला असून जनरल ठिकाणी सरपंच होते म्हणल्यानंतर जातीवादी समाजकंटकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली आणि कामांमध्ये अडथळा देऊन बदनामी करण्याचा प्रयत्नही केला परंतु योग्य अशें बहुजन समाज पार्टीचे नेते डॉ.शंकरदादा माने यांचे नेतृत्व व माझ्यापुढे शाहू, फुले,आंबेडकर, कांशीराम, आणि बहन कुमारी मायावती यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या महामानवांना जो त्रास लोकांनी दिला ते मला थोडी सोडतील आणि त्यांना जो त्रास झाला तोच त्रास मला होणार हे मला माहीत होते
परंतु मी या नेत्यांच्या योगदान आणि समाजकारणाचा वारसा जपण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत
आहे आणि तो मी करत राहिल माझ्या गावचा विकास हाच माझा ध्यास या विचाराने मी काम करत आहे आणि करत राहील माझ्या पाठीमागे इरळी गावातील सर्व जाती धर्मातील ग्रामस्थ उभे असल्यामुळे मी या गावामध्ये जातीवादी लोकांना तोंड देऊन गाव विकासाचे काम करत आहे आणि जोपर्यंत मी या पदावर आहे तोपर्यंत कोट्यावधीरुपयाचे ग्राम विकासाची कामे करणार आहे त्याचप्रमाणे विद्यार्थीचा शिक्षणासाठी, शेतकऱ्यांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी, व कामगारांसाठी काम करत राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये मला मिळालेल्या संधीचे सोने करायचे आहे आणि गोर गरीबाच्या घरापर्यंत आपल्यातील सरपंच झाला की आपल्याला काय फायदा होता हे दाखवून द्यायचं आहे त्यासाठी मी अहो रात्र प्रयत्न करत आहे व करत राहील आशे सांगते असे मनोगत व्यक्त केले व त्याने कामाचा शुभारंभ केला याप्रसंगी प्रकाश पाटील, सुभाष पाटील, छबुताई कोडक, वनिता पाटील, कमल पाटील, कॉन्टॅक्टर सुनील बनसोडे,अक्षय बनसोडे,व शिपाई नाता लांडगे ,नाथा यादव या सह परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते