कवठे महांकाळ तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी उमेश पाटील बिनविरोध
सांगली न्यूज डिजिटल
कवठे महांकाळ : तालुक्याच्या नावलौकिकाला साजेशी बिनविरोध निवड करून वकील संघटनेने सन २०२४-२५ च्या कार्यकारिणीची निवड केली.उमेश पाटील यांची अध्यक्षपदी श्रीकांत हिरेमठ यांची उपाध्यक्षपदी तर राजकुमार कोष्टी यांची सचिव पदी निवड करण्यात आली.वकील संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची मुदत ही सन २०२४-२५ या कालावधीसाठी करण्यात आली.ॲड.नंदकुमार बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कमिटी यांनी या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली.
समाजातील एक महत्वाचा घटक म्हणून वकील वर्गाकडे पाहिले जाते.वंचित,गोरगरीब,दीन दुबळ्या तसेच कामगार,शेतकरी लोकांच्या हक्कासाठी,अधिकारासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी लढण्यासोबतच समाजाचे प्रतिनिधित्व देखील वकील वर्ग करत असतो.न्यायव्यवस्थेतील एक महत्वाचा दुवा हा वकील असतो,मात्र या वकील वर्गाच्या काही मागण्या,प्रश्न आहेत.राहुरी सारख्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या
कृत्यामुळे वकील वर्ग सुरक्षित नाही.तालुक्यातील वकील बांधवांचे प्रश्न आणि पक्षकार यांना भेडसावणाऱ्या समस्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असा आशावाद नवनिर्वाचीत अध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केला.वकील बांधवांचे हित जोपासण्यासाठी वकील संघटने मार्फत प्रयत्नशील राहू असा विश्वास उमेश पाटील यांनी व्यक्त केला.
वकील संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडीबद्दल इतर वकील सभासद,विविध क्षेत्रातील मान्यवर आदींनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.