कुमारी स्वप्नाली शिंदे या 'डॉक्टर ऑफ सोशल वर्क्स ' पदवीने सन्मानितसांगली न्यूज डिजिटलपाचेगाव-बु (ता सांगोला) येथील व सध्या सांगली येथे रहिवासी असलेल्या कुमारी स्वप्नाली श्रीरंग शिंदे यांनी आजवर केलेल्या अतुलनिय अशा सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना इंटरनॅशनल युनिस एज्युकेशन कौन्सिल फ्रान्स या विद्यापीठाने त्यांना 'डॉक्टर ऑफ सोशल वर्क्स' या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.पुणे कोरेगाव पार्क येथील एका पंचतारांकित हॉटेलांमध्ये झालेल्या भरगच्च अश्या एका कार्यक्रमात त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पदवीने सन्मानित करण्यात आले.कुमारी स्वप्नाली श्रीरंग शिंदे यांनी आपल्या बचतगटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात हिरारीने सहभाग घेऊन ते तडीस नेले आहे.त्यांनी आपल्या 'श्रीसाईसिध्द फाऊंडेशनच्या माध्यमातून शासकीय पंधराव्या वीत आयोगाच्या माध्यमातून युवती,महिलांना प्रशिक्षण देऊन सक्षम केले.त्याचबरोबर दिव्यांग सेवा,क्षयरोग,एड्स या क्षेत्रातील जनजागृतीपर केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना या पदवीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यापुर्वीही त्या अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित झाल्या आहेत.यावेळी इंटरनॅशनल एज्युकेशन कॉन्सीलचे संस्थापक डॉ एम आय प्रभू,विद्यापीठ कॉन्सीलचे आम्बेसिटर मिस रिटा मिलोने,कॉन्सील सिलेक्शन कमिटीच्या मुख्य गायत्री देवी,डॉ गणेश वाईकर,डॉ गौतम प्रज्ञासुर्य,डॉ संतोष कदम,डॉ प्रमोद मानेसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुमारी स्वप्नाली शिंदे या 'डॉक्टर ऑफ सोशल वर्क्स ' पदवीने सन्मानित
January 31, 2024
0
Share to other apps