yuva MAharashtra रस्त्यांवर खत-मातीचे ढिगारे, ट्रॅक्टर्सच्या रांगा, ‘या’ देशातल्या शेतकऱ्यांकडून सरकारची नाकेबंदी, आंदोलनाची जगभर चर्चा

रस्त्यांवर खत-मातीचे ढिगारे, ट्रॅक्टर्सच्या रांगा, ‘या’ देशातल्या शेतकऱ्यांकडून सरकारची नाकेबंदी, आंदोलनाची जगभर चर्चा

Admin
0
रस्त्यांवर खत-मातीचे ढिगारे, ट्रॅक्टर्सच्या रांगा, ‘या’ देशातल्या शेतकऱ्यांकडून सरकारची नाकेबंदी, आंदोलनाची जगभर चर्चा. 

 

सांगली न्यूज.                            
 

बर्लिनमधल्या ब्रँडनबर्ग गेटजवळ हजारो शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी येथील रस्त्यांवर हजारो ट्रॅक्टर्स उभे केले आहेत.





जर्मनीत शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे.
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची जगभरातील अनेक देशांनी, नेत्यांनी, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आणि कलाकारांनी नोंद घेतली होती. आता शेतकऱ्यांचं असंच एक लक्षवेधी आंदोलन जर्मनीत चालू आहे. शेतकऱ्यांनी या आंदोलनाद्वारे जर्मन सरकारला कोंडीत पकडलं आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात (सबसिडी) कपात केल्याने जर्मनीतले शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. यासह सरकारने कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या डिझेलवर दिला जाणारा पार्शियल रिफंड (आंशिक परतावा) बंद केला आहे. वाहनं, ट्रॅक्टर आणि ट्रक्सच्या खरेदीवरील टॅक्समध्ये सूट देणं बंद केलं आहे. त्यामुळे जर्मनीतले शेतकरी याविरोधात आक्रमक झाले आहेत.

जर्मन सरकारने १३ डिसेंबर २०२३ रोजी घोषणा केली की, शासनाकडून शेतकऱ्यांना दिलं जाणारं अनुदान कमी केलं जाणार आहे. तसेच शासनाकडून डिझेलच्या खरेदीनंतर दिला जाणारा परतावा, कृषी अवजारं आणि वाहनांच्या (ट्रक, ट्रॅक्टर) खरेदीवरील टॅक्समध्ये दिली जाणारी सूट बंद केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top