तासगाव तालुका परिट समाज मेळावा संत गाडगे बाबा मठ कवठेएकंद येथे गुरुवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ सांगली जिल्हा अध्यक्ष संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सांगली न्यूज
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मनोहर साळुंखे, पश्चिम विभागीय अध्यक्ष अनिल साळुंखे, राज्य सल्लागार सुर्यकांत परीट, माजी जिल्हा अध्यक्ष अशोकराव शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा शर्मिलाताई शिंदे, जिल्हा कार्यध्यक्ष संगीताताई राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख व शिराळा तालुका अध्यक्ष रवि यादव, जिल्हा सचिव विजय खेडकर, जिल्हा युवा अध्यक्ष रोहन परीट, जिल्हा कार्याध्यक्ष महेश निकम, सातारा जिल्हा तंटामुक्त प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड हे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलन व संत गाडगे महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
स्वागत प्रास्ताविक तासगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसे यांनी केले. यावेळी अशोकराव शिंदे, मनोहर साळुंखे, रवि यादव, अनिल साळुंखे, बाबुराव गायकवाड, रमेश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मेळाव्यास पलुस तालुका अध्यक्ष बबनराव शिंदे, वाळवा तालुका अध्यक्ष संजय जांभळे, कडेगाव तालुका अजय चन्ने, कवठेमहंकाळ तालुका अध्यक्ष विशाल रसाळ, राजेंद्र राऊत, विटा शहर अध्यक्ष नामदेव शिंदे, रमेश गायकवाड, जयसिंग परिट, विक्रम रसाळे, अरविंद रसाळे, संजय रसाळे, पांडुरंग परीट, नेताजी पावशे, सतीश परीट,विशाल रसाळ, बाळासो पावशे, मधुकर पावशे महाराज, अमोल रसाळ, अमित शिंदे, गणेश धोत्रे, अनिल दळवी, बजरंग दळवी, ज्योतीराम रसाळे, उत्तम रसाळे, वैभव शिंदे, संतोष परीट,रेखाताई भंडारे, प्रियांका पावशे, मनीषा दळवी, मयुरी रसाळे, स्वाती रसाळे, भाग्यश्री रसाळे, राजश्री पावशे, स्मिता रसाळे तसेच यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव महिला मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये तासगाव तालुका परीट समाज नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन बबनराव शिंदे केले. आभार गणेश धोत्रे यांनी मानले.
