बांधकाम कामगाराची नोंदणी फुकट करून देणार डॉ. शंकरदादा माने
ढालगाव:बहुजन समाज पार्टीच्या वतीने ढालगाव येथे ढालगाव सेक्टर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले हे उद्घाटन डॉ. शंकर माने यांच्या हस्ते करण्यात आले हे कार्यालय काढण्याच्या पाठीमागचा मूळचा उद्देश बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन वेगळा असून परिसरातील गोरगरीब कष्टकरी कामगार आज एजंटाच्या गिळक्यात अडकलेले आहेत आज कामगारांचे हजारो रुपये लुटले जात आहेत आणि मूळ कामगारांना कामगार योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून गावोगावी कामगारांच्या घरोघरी पोचून गरजू ,गरीब, कष्टकरी, वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम या कार्यालय मधून केले जाणार आहे उद्घाटन प्रसंगी डॉ. शंकर माने म्हणाले की गोरगरीब कामगारांसाठी आम्ही कायम धोरणात्मक आहोत कामगारांची सर्व कामे व त्यांच्या मुलाचे शिक्षण मोफत करून देणे हे कामगार नेत्याचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आम्ही पार पाडणार आहोत परिसरातील सर्व कामगारांना कामगार नोंदणी मोफत करून देणार आहोत उद्घाटन प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी दत्तात्रय बामणे उपस्थित होते त्याचप्रमाणे महिला जिल्हा प्रभारी सविता माने याही उपस्थित होत्या विधानसभा अध्यक्ष मन्सूर अत्तार, महिला अध्यक्ष उज्वला धोत्रे, कामगार संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष राखी शिंदे, इरळी गावच्या सरपंच संजना आठवले, दशरथ सूर्यवंशी, वैभव शिंदे, सुभाष मराठे, तालुका अध्यक्ष शुभम चव्हाण, शहराध्यक्ष सुमित गाडे, संतोष वानखडे, दिपाली पाटील, सुनिता सपकाळ, सविता कदम, रंजना वाघमारे, शोभा माने, ज्योती माने, धोंडूबाई सरोदे, संभाजी शिंदे, अब्दुल मुलाने, वसंत यादव, भरत थोरात, प्रकाश देवकुळे, अरुण भंडारे, आधी गावकरी व परिसरातील सर्व बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते

