yuva MAharashtra कोकळे येथे विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा......

कोकळे येथे विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा......

Admin
0



सांगली न्यूज

ग्रामसभा तहकूब झाल्याने नागरिकांच्यात नाराजी......

कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.श्री रेणुका विद्या मंदिर कोकळे, जिल्हा परिषद शाळा नंबर एक, विकास सेवा सहकारी सोसायटी, कोकळे ग्रामपंचायत कार्यालय इतर ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच इतरत्र ठिकाणी विविध मान्यवरांनी ध्वजारोहण केले श्री रेणुका विद्यालय कोकळे येथे इयत्ता आठवी सहामाही परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवलेल्या आकांक्षा पवार या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण केले.तसेच जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी ध्वजारोहण केले. कोकळे विकास सेवा सहकारी सोसायटी येथे व्हा.चेअरमन
देमाजी ओलेकर यांनी ध्वजारोहण केले.शेवटी कोकळे ग्रामपंचायत येथे कोकळे गावचे उद्योजक धनाजी (नाना) भोसले यांनी ध्वजारोहण करून मानवंदना दिली.व तंबाखू मुक्तची शपथ घेतली. कार्यक्रमानंतर कोकळे व कोकळे परिसरातील विविध शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केली. यावेळी लोकनियुक्त सरपंच विजयभाऊ तोडकर, उपसरपंच मालन माने, ग्रामविकास अधिकारी बजरंग बुरुटे, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी, मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित हो


 *लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ* : ग्रामसभा
आपल्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा म्हणजे महत्वाची सभा. या ग्रामसभेला 73 व्या घटना दुरुस्तीने संवैधानिक आधार दिलाय. या दुरुस्तीमुळे संविधानाच्या 11 व्या अनुसूचीतील तब्बल 29 विषय हस्तांतरीत केलेत. त्यातील बरेचसे विषय आता आपल्या राज्यातही पंचायतींकडे आलेत. म्हणून त्या विषयावर गावाचं विकास धोरण ठरवण्याचा अधिकार आता आपल्या ग्रामसभेला आलाय. आपली ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा आधारभूत कणा आहे. ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचं मूळ आहे. ते जितकं मजबूत, तितका आपल्या लोकशाहीचा वृक्ष मजबूत असणार. मग इतकी महत्वाची ग्रामसभा 26 जानेवारी रोजीची कोकळे ता.कवठेमहांकाळ ग्रामपंचायतची शुक्रवार दुपारी 1.30 वाजताची ग्रामसभा तहकूब करण्यात आल्याने नागरिकांच्यात नाराजी निर्माण झाली यावेळी कोकळे गावचे नेते मा.संभाजी शिंदे म्हणाले की,क्वचित प्रसंगी एखादी ग्रामसभा आधार कार्ड अपडेटच्या कॅपच्या वेळी आलेल्या लोकांच्या सह्या घेऊन दाखवल्या आहेत.परंतु बऱ्याच ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या आहेत. म्हणून त्यांनी सुध्दा आपल्या शब्दातून नाराजी व्यक्त केली.
 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top