कोकळे गावात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
सांगली न्यूज
कोकळे तालुका कवठेमहांकाळ या गावात 26 जानेवारी 2024 रोजी सार्वजनिक प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोकळे गावचे उद्योजक मा. श्री धनाजी भोसले (नाना ) यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात आले. व त्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळा क्रं १ व २, कन्या शाळा, झिटे वस्ती, पाटील मळा व इतर भाग शाळा तसेच श्री रेणुका विद्यामंदिर कोकळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब ओलेकर सर यांनी केले.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, भावगीते, भक्तीगीते, व लोकगीते आदि गीतांवर नृत्ये सादर करुन उपस्थितांची मने जिंकलीत.
श्री रेणुका विद्या मंदिर कोकळे येथील सहभागी विद्यार्थ्यांनी
'महाराष्ट्राची लोकधारा' या संकल्पनेवर आधारित नृत्याविष्कार साजरा केला.
सांस्कृतिक विभाग प्रमुख बाबासाहेब भोसले यांच्या नियोजनातून तर वनिता कोळी मॅडम यांच्या सहकार्याने, व मुख्याध्यापिका कुमारी हिरुगडे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली हे लोकगीतांवर आधारित नृत्याविष्कार सादर करण्यात आले.
जि. प. शाळा न.१ चे नियोजन बुरुटे सर, शेंडगे सर कन्या शाळेच्या तांबोळी मॅडम यांनी नियोजन केले.
या कार्यक्रमासाठी कोकळे गावचे नवनिर्वाचित सरपंच विजय भाऊ तोडकर, उपसरपंच मालन माने, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास आधिकारी श्री. बजरंग बुरुटे, व ग्रामपंचायत कर्मचारी, आदिसह सर्व संस्थाचे पदाधिकारी, सर्व शाळांचे शिक्षक, ग्रामस्थ, पालक, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



