yuva MAharashtra राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्रा. अमोलकुमार वाघमारे सन्मानित*

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्रा. अमोलकुमार वाघमारे सन्मानित*

Admin
0
राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्रा. अमोलकुमार वाघमारे सन्मानित.                       
                                                   🔰  सांगली न्यूज   🖋️                                                           
नवी मुंबई: महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा नुकताच दि महाराजा रॉयल रिसॉर्ट जांभूळ फाटा,अंबरनाथ, जिल्हा ठाणे या ठिकाणी संपन्न झाला कोकण विभागीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 104 अर्थात शाहू महाराज विद्यालय चे अष्टपैलू क्रीडाशिक्षक प्रा अमोलकुमार बबुताई महादेव वाघमारे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी ठाणे श्रीमती दहीतुल्ले मॅडम ,शिक्षक संघटना पदाधिकारी असिफ बावा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मानाचा फेटा, मायेची शाल, सन्मानपत्र, मेडल व ग्रंथ भेट देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी वाघमारे यांच्यासोबत 120 संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य ,क्रीडा शिक्षक, सहायक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी मुरबाडचे आमदार किसन कथोरे, अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर ,कोकण विभागीय पदवीधर आमदार निरंजन डावखरे ,बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, मुख्याधिकारी योगेश गोडसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास कोकण विभागातील जवळपास दोन हजार शिक्षकांनी हजेरी लावली होती अतिशय राजेशाही थाटात हा शिक्षक सन्मान सोहळा पार पडला
 हा पुरस्कार मिळण्यामध्ये स्वतःच्या मेहनत व कष्टा सोबतच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व सहकारी शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, विहंग क्रीडा मंडळ ऐरोली त्याचबरोबर आई, वडील, भाऊ,बहिण व पत्नी तसेच मामा प्रा. सुरेश जाधव सर यांचा मोलाचा वाटा आहे. या पुरस्काराने खूप मोठे बळ मिळाले आहे व अधिक जोमाने व उत्साहाने यापुढे ही काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे असे उद्गगार पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षक प्रा. अमोलकुमार वाघमारे यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top