शिरढोण येथे शासन निर्णयाची होळी..
दुधाला उत्पादन खर्चाच्या आधारेच दर द्या. भाई दिगंबर कांबळे.
दूध उत्पादन खर्चानुसार दर नसल्याने व पशुधन कान बिल्ला असलेल्याच गाईंच्या दुधाला प्रती लिटर 5 रुपये अनुदान देणार असल्याच्या शासन निर्णयाच्या परिपत्रकाची आज शिरढोण ग्रामपंचायत पटांगणात होळी करण्यात आली..
गेल्या अनेक वर्षापासून दूध उत्पादन खर्चा नुसार गाईच्या दुधाला 43 रुपये व म्हैशी च्या दुधाला 79 रुपये दराची मागणी राज्यभरातील दूध उत्पादक संघर्ष समिती व शेतकऱ्यांच्या कडून केली जात आहे.. या मागणीला फाटा देवून फक्त गाईच्या दुधाला अन्यायकारक अटी घालून 5 रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय हा दूध उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा करणारा आहे..
शासनाने उत्पादन खर्चाच्या आधारेच दर देण्याचा निर्णय घेण्याची मागणी आज सोमवार 8 जानेवारी रोजी शिरढोण तालुका कवठे महांकाळ येथे शासन निर्णयाची होळी करून करण्यात आली..
यावेळी शासनाच्या निर्णया विरोधात घोषणा देण्यात आल्या .
केंद्र शासनाने 2017 मध्ये दूध फॅट बाबत पारित केलेला निर्णय 3.2 फॅट व 8.3 एस एन एफ असताना राज्य सरकारने 3.5 आणी 8.5 घेतलेला हा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर पाठीमागे दीड ते दोन रुपये नुकसान करणारा आहे.
शासन निर्णयाची हि अनुदान योजना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंतच राबविण्याची मान्यता देण्यात आली आहे.. ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर 5 रूपये अनुदान मिळणार आहे. त्या दूध उत्पादक शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी संलग्न लिंक असणे आवश्यक आहे..लिंक नसणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही..दुधाला उत्पादन खर्चाच्या आधारेच दर मिळावा व अन्यायकारक शासन आदेशा मध्ये सुधारणा करून नवीन परिपत्रक काढण्यात यावे यासाठी आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास शिरढोण तालुका कवठे महांकाळ येथे नॅशनल हायवे जनावरासह चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे. दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती चे नेते जोतिराम जाधव, शरद पवार, प्रभाकर पाटील, प्रितम पाटील, सचिन सोनवणे,नामदेव पाटील, मच्छिंद्र पाटील, विठ्ठल कदम, कृष्णा पाटील, निलेश पाटील,कृष्णा सुर्यवंशी व दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
