yuva MAharashtra अनिता साळुंखे राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

अनिता साळुंखे राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

Admin
0
अनिता साळुंखे राजमाता जिजाऊ पुरस्काराने 




सांगली न्यूज 

तिसंगी (ता कवठेमहांकाळ) येथील प्रतिष्ठीत महिला नागरिक सौ अनिता दिलीप साळुंखे यांनी समाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल त्यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय कॉग्रेस पक्षा अंतर्गत रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा प्रतिष्ठेचा राजमाता जिजाऊ साहेब गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले 


      टिळक भवन मुंबई येथे घेण्यात आलेल्या भरगच्च अशा कार्यक्रमात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या हस्ते सौ अनिता साळुंखे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी रोजगार व स्वयंरोजगार सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे-पाटील,उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी,प्रदेश महीला कॉग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सवालाखेसह पदाधिकारी,सदस्य, सभासद व महीलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन प्रज्ञा वाघमारे यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top