yuva MAharashtra इलेक्ट्रॉनिक्स,सौंदर्य उत्पादने आणि वाहने होणार महाग

इलेक्ट्रॉनिक्स,सौंदर्य उत्पादने आणि वाहने होणार महाग

Admin
0


 द जनसत्ता न्यूज 

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची वेगाने होत असलेली घसरण सामान्य नागरिकांच्या खर्चात मोठी वाढ करणार आहे. रुपया कमजोर झाल्याचा थेट परिणाम आयात-आधारित वस्तूंवर होणार असून, यात मोबाईल फोन, टीव्ही, लॅपटॉप, एसी, फ्रीज तसेच महागडी सौंदर्य उत्पादने आणि वाहनांचाही समावेश आहे.


आयात कंपन्यांना मोठा फटका

उत्पादन भाग किंवा संपूर्ण वस्तू विदेशातून आयात करणाऱ्या कंपन्यांना रुपयाच्या या कमजोर स्थितीचा मोठा त्रास होत आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे कंपन्यांना आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि आता रुपयाची घसरण यामुळे कंपन्यांना झालेला वाढीव खर्च ग्राहकांवर टाकण्या शिवाय पर्याय उरलेला नाही.

डिसेंबर-जानेवारीपासून दरवाढ निश्चित.मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि मोठ्या घरगुती उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी डिसेंबर ते जानेवारी २०२६ या काळात त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत ३ ते ७ टक्क्यांनी वाढ करण्याची तयारी दर्शवली आहे.

 

मेमरी चिप्स ,तांबे आणि इतर आवश्यक सुट्या भागांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.अनेक वस्तूंच्या उत्पादन खर्चाचा ३० ते ७० टक्के हिस्सा आयातीवर अवलंबून असल्याने, रुपयाची कमजोरी थेट उत्पादन खर्च वाढवत आहे.


 *जीएसटी कपातीचा फायदा संपुष्टात* 


मुख्य कार्यकारी अधिकारी अवनीत सिंग मारवाह यांनी सांगितले की, "जीएसटी कपातीचा जो काही फायदा ग्राहकांना मिळाला होता, तो संपूर्ण फायदा आता रुपयाची कमजोरी आणि सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे संपुष्टात येईल." त्यांनी हेही स्पष्ट केले की, केवळ मेमरी चिप्सचे दर चार महिन्यांत सहा पटीने वाढले आहेत.


 *कंपन्यांच्या बदललेल्या योजना* 


कंपन्यांनी पूर्वी रुपयाचा दर ८५ ते ८६ रुपये प्रति डॉलर इतका गृहीत धरून आपल्या योजना आखल्या होत्या, पण आता हा दर ९० रुपयांचा टप्पा ओलांडल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.


▪️हॅवेल्स एलईडी टीव्ही सुमारे ३%  


▪️सुपर प्लास्ट्रोनिक्स विविध उत्पादने ७ ते १०% 


▪️गोदरेज ॲप्लायन्सेस एसी आणि फ्रीज ५ ते ७% 


▪️सौंदर्य उत्पादने आणि वाहनेही महागणार

 

 *सौंदर्य उत्पादने:* 


सौंदर्य उत्पादनांचे क्षेत्रही प्रभावित होणार आहे. शिसेडो, एमएसी, बॉबी ब्राऊन, क्लीनिक आणि द बॉडी शॉपसारखे परदेशी ब्रँड्सची उत्पादने रुपयाच्या घसरणीमुळे आणखी महाग होतील.

वाहन क्षेत्र

दुचाकी आणि लहान गाड्यांवर जीएसटी घटल्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये विक्रीत मोठी वाढ नोंदवली गेली होती, मात्र रुपयाच्या घसरणीमुळे वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याने ही गती पुन्हा थांबण्याची भीती आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top