yuva MAharashtra बिरसा मुंडां यांच्या विचारांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवचैतन्य दिले.-- डॉ सरस्वती अंदेलवार*

बिरसा मुंडां यांच्या विचारांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवचैतन्य दिले.-- डॉ सरस्वती अंदेलवार*

Admin
0


 द जनसत्ता न्यूज 

  घाटनांद्रे/वार्ताहर :-जालिंदर शिंदे 

 पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय कवठेमहंकाळ येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ जी डी कोरे,ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा धनपाल यादव व प्रमुख वक्ते डॉ सरस्वती अंदेलवार यांच्या संयुक्त हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी बिरसा मुंडा यांचे जीवन व कार्य या विषयावर डॉ. सरस्वती अंदलवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ दिलीप गाडे यांनी केले.यावेळी त्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनाचा आराखडा थोडक्यात मांडला.आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे तसेच जनजाती समाजाचा सन्मान,त्यांचा विकास आणि त्यांची ओळख जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असे सांगितले.  

        प्रमुख वक्ते डॉ अंदेलवार यांनी बिरसा मुंडा हे फक्त एक नाव नाही तर आदिवासी स्वाभिमान,संघर्ष आणि स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक आहेत. तसेच आपल्या समाजाच्या दुःखदायी स्थितीचा ब्रिटिश सत्तेने केलेल्या अत्याचारांचा आणि सामाजिक अन्यायाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.त्यातूनच त्यांनी जनतेला एकत्र करून "उलगुलान" बंड उभारले असे त्यांनी सांगितले. 

       यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ जी डी कोरे यांनी आपले अध्यक्षीय मनोगतामध्ये बिरसा मुंडा यांच्या नावाने अनेक संस्था आहेत.जल,जमीन आणि जंगल हा आदिवासींचा नारा असून यातून लोकांच्या मध्ये एक प्रेरणा निर्माण होते.त्यांच्या कार्याचा आदर्श तरुणांनी घेतला पाहिजे असे सांगितले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ किरण सकट यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा निशिकांत वाघमारे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ दिलीप गाडे यांनी केले.यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील,सचिव सुदर्शन शिंदे,प्र प्राचार्य डॉ जी डी कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात केले होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top