yuva MAharashtra कुणी 27 मतांच्या फरकानं जिंकलं, तर कुणी 95 मतांच्या; बिहारमध्ये 'या' 9 जागांवर दिसल्या थरारक लढती

कुणी 27 मतांच्या फरकानं जिंकलं, तर कुणी 95 मतांच्या; बिहारमध्ये 'या' 9 जागांवर दिसल्या थरारक लढती

Admin
0


 


द जनसत्ता न्यूज 

Bihari election :*श राधा चरण साह (संदेश), महेश पासवान (अगिआंव) आणि मनोज बिस्वास (फारबिसगंज) हे आपापल्या जागांवर विजयी झाले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत काही जागांवरील निकाल शेवटच्या क्षणापर्यंत लांबले. अनेक मतदारसंघांत उमेदवार अल्प मतांनी मागे-पुढे होत होते. काही जागांचा तर 27 आणि 95 अशा अत्यल्प फरकाने निकाल लागला.


या जागांचा निकाल खऱ्या अर्थाने श्वास रोखणारा ठरला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत कोण, कुठे आणि किती मतांनी जिंकले हे जाणून घेऊया.


बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीला 40 जागांचाही टप्पा पार करता आलेला नाही.


काही जागांवर अत्यंत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली आणि उमेदवारांमधील विजयाचं अंतरही खूपच कमी होतं.


1. संदेश


बिहारमधील संदेश या मतदारसंघात संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) राधा चरण साह यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) दीपू सिंह यांचा पराभव केला.


या मतदारसंघात जेडीयूच्या उमेदवारांनं अवघ्या 27 मतांच्या फरकाने विजय मिळवला.


राधा चरण साह यांना 80 हजार 598 मतं मिळाली, तर दुसऱ्या स्थानावरील दीप सिंह यांना 80 हजार 571 मतं मिळाली.


तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले जन सुराज पक्षाचे राजीव रंज राज यांना 6 हजार 40 मतं मिळाली.


2. अगिआंव


आरातील अगिआंव मतदारसंघात भाजप आणि सीपीआय (एमएल) यांच्या उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली.


येथील मतमोजणी होत असताना निकालात अनेकदा चढ-उतार दिसून आले.


शेवटी भाजपचे महेश पासवान 95 मतांच्या फरकाने विजयी झाले. या जागेवर सीपीआयचे (एमएल) शिव प्रकाश रंजन दुसऱ्या क्रमांकावर राहिले.


3. फारबिसगंज


फारबिसगंज मतदारसंघात काँग्रेसचे मनोज बिस्वास आणि भाजपचे विद्या सागर केशरी यांच्यात चुरशीची लढत झाली.


ही जागा काँग्रेसने केवळ 221 मतांनी जिंकली. काँग्रेसचे मनोज बिस्वास यांना 1 लाख 20 हजार 114 मतं मिळाली.


तर दुसऱ्या क्रमांकावरील विद्या सागर केशरी यांना 1 लाख 19 हजार 893 मतं मिळाली.


4. चनपटिया


पश्चिम चंपारणच्या चनपटिया मतदारसंघात काँग्रेसचे अभिषेक रंजन आणि भाजपचे उमाकांत सिंह यांच्यात जोरदार सामना झाला.


या जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराने 602 मतांनी विजय मिळवला. अभिषेक रंजन यांना एकूण 87 हजार 538 मतं मिळाली.


भाजपच्या उमाकांत सिंह यांना 86 हजार 936 मतं मिळाली. या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले जन सुराज पक्षाचे उमेदवार त्रिपुरारी कुमार तिवारी उर्फ मनीश कश्यप यांना 37 हजार 172 मतं मिळाली.


5. बोधगया


बोधगया जागेवर आरजेडी आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) (एलजेपी) यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली.


आरजेडीचे कुमार सर्वजीत यांनी एलजेपीचे (रामविलास) उमेदवार श्यामदेव पासवान यांना 881 मतांनी पराभूत करून विजय मिळवला.


कुमार सर्वजीत यांना 1 लाख 236 मतं मिळाली. तर एलजेपीचे (रामविलास) श्यामदेव पासवान यांना 99 हजार 355 मतं मिळाली.


6. बख्तियारपूर


आणखी एका जवळच्या लढतीत एलजेपीचे (रामविलास) अरुण कुमार यांनी आरजेडीचे अनिरुद्ध कुमार यांना 981 मतांनी पराभूत केलं.


अरुण कुमार यांना 88 हजार 520 मतं मिळाली, तर अनिरुद्ध कुमार यांना 87 हजार 539 मतं मिळाली.


जन सुराज पक्षाचे उमेदवार बाल्मिकि सिंह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 6 हजार 581 मतं मिळाली.


7. बलरामपूर


बलरामपूर जागेवर एलजेपी (रामविलास) आणि एआयएमआयएम यांच्यातही चुरशीची लढत पाहायला मिळाली.


एलजेपीच्या (रामविलास) संगीता देवी यांनी एआयएमआयएमचे मोहम्मद आदिल हसन यांना 389 मतांनी पराभूत केलं.


 ECIआरजेडीचे उमेदवार फैसल रहमान 178 मतांनी विजयी झाले.


संगीता देवी यांना 80 हजार 459 मतं तर मोहम्मद आदिल हसन यांना 80 हजार 70 मतं मिळाली.


या जागेवर सीपीआयचे (एमएल) महबूब आलम तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 79 हजार 141 मतं मिळाली.


8. ढाका


या जागेवर आरजेडीचे फैसल रहमान 178 मतांनी विजयी झाले. त्यांना भाजपचे पवन कुमार जयस्वाल यांनी जोरदार टक्कर दिली.


फैसल रहमान यांना 1 लाख 12 हजार 727 तर पवन कुमार जयस्वाल यांना 1 लाख 12 हजार 549 मतं मिळाली.


तिसऱ्या क्रमांकावर जन सुराजचे उमेदवार डॉ. एलबी प्रसाद यांना 8 हजार 347 मतं मिळाली.


9. जहानाबाद


आरजेडीचे राहुल कुमार यांनी चुरशीच्या लढतीत जेडीयूचे चंदेश्वर प्रसाद यांना 793 मतांनी पराभूत केले.


राहुल कुमार यांना 86 हजार 402 मतं, तर जेडीयूचे चंदेश्वर प्रसाद यांना 85 हजार 609 मतं मिळाली.


या जागेवर जन सुराजचे उमेदवार अभिराम सिंह यांना 5 हजार 760 मतं मिळाली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top