द जनसत्ता न्यूज
जालिंदर शिंदे
घाटनांद्रे/वार्ताहर :- आमची सलग तिसरी पिढी ही राजकारणा बरोबरच समाजकारणात सक्रिय आहे. विकासकामांच्या जोरावरच माझे आजोबा रामराव बोराडे यांनी सलग चाळीस वर्षे जाखापूरचे सरपंच पद व पाच वर्षे जिल्हा परिषदेचे सभापती पद तर वडील शिवाजीराव बोराडे यांनी पाच वर्षे जाखापूर गावचे सरपंच पद भुषविले आहे.त्यांचा कुशल राजकीय वारसा आपणास लाभला असून,आपणही राजकीय व सामाजिक जीवनात सदैव सक्रिय असतो.
मी एक उच्च सुशिक्षित व सर्वसामान्य लोकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाची जाणिव असणारा कार्यकर्ता आहे.त्यामुळे जर माजी खासदार संजयकाकांनी नागज गणातून लढण्याचा आदेश अथवा संधी दिलीच तर आपण कोणतीही कसूर न ठेवता पुर्ण ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन सिध्देश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते राहुलदादा बोराडे यांनी जाखापूर (ता कवठेमहांकळ) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की माजी खासदार संजयकाका पाटील यांनीही आपल्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या कालावधीत घाटमाथ्यासह कवठेमहंकाळ तालुक्यात प्रचंड अशी विकास कामे केली आहेत.पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा टेंभू व म्हैसाळ उपसा जलसिंचन योजने द्वारे पुर्णतः मार्गी लावला असुन, सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारे खासदार म्हणून त्यांची एक स्वतंत्र ओळख आहे.आजही प्रत्येक गावात त्यांना मानणारा स्वतंत्र असा निष्ठावंत मोठा गट कार्यरत आहे.त्यामुळे या गणातून लढताना कोणतीही अडचण येणार नाही असेही ते म्हणाले.
यावेळी घाटमाथ्यावरील धडाडीचे युवा नेते व मार्गदर्शक महादेवराव पाटील,ग्रामपंचायत सदस्या रंजना केंगार,अशाराणी पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य उमराव पवार,विठ्ठल पाटील,अनिल माने,गणेश पाटील,लालासो पवारसह कार्यकर्ते उपस्थित होते.
