खास प्रतिनिधी/द जनसत्ता न्यूज
कवठेमहांकाळ
इमदाद मल्टीपर्पज फौंडेशन, कवठेमहांकाळ या संस्थेच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त नगरपरिषद नाट्यगृह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला समाजातील विविध *स्तरांतील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कवठेमहांकाळचे शासकीय वैद्यकीय अधिकारी मा. अजय भोसेकर सर, तसेच नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.*
कार्यक्रमास इमदाद मल्टीपर्पज फौंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगत “रक्तदान ही मानवतेची खरी सेवा आहे” असा संदेश दिला.*
*या रक्तदान शिबिरात तब्बल ७५ रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान केले, जे रक्त गरजू रुग्णांच्या सेवेसाठी देण्यात येणार आहे.*
*विशेष म्हणजे, इमदाद मल्टीपर्पज फौंडेशन या शिबिरांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करते, आणि गरजूंना वेळेवर मदत मिळावी हा संस्थेचा हेतू आहे.*
*या शिबिरास सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल ब्लड बँक, मिरज तसेच M.S.I. ब्लड सेंटर, मिरज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.*
*कार्यक्रमाचे आयोजन इमदाद मल्टीपर्पज फौंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.*
*शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक आणि युवक वर्गाने मोलाचे योगदान दिले.*
*संस्थेच्या वतीने सर्व रक्तदाते, पाहुणे, पत्रकार बांधव आणि उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.*
*– इमदाद मल्टीपर्पज फौंडेशन, कवठेमहांकाळ*
*“रक्तदान – जीवनदान” या सामाजिक संदेशासह समाजसेवेची वाटचाल पुढेही सुरूच राहणार आहे.*


