yuva MAharashtra शाळेचा तोच गंध,तोच सहवास...* *जुन्या आठवणींसोबत खास...* *तब्बल २१ वर्षांनंतर होतोय आमचा गेट-टुगेदर झक्कास...*

शाळेचा तोच गंध,तोच सहवास...* *जुन्या आठवणींसोबत खास...* *तब्बल २१ वर्षांनंतर होतोय आमचा गेट-टुगेदर झक्कास...*

Admin
0


 *

घाटनांद्रे/वार्ताहर :-

जालिंदर शिंदे 

 तब्बल २१ वर्षानंतर सर्वोदय विद्यालय घाटनांद्रे हायस्कूल मधील २००३-४ सालच्या इयत्ता दहावीच्या बॅचचा गेट-टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमासाठी आजी माजी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.या बॅचचे तत्कालीन सेवानिवृत्त वर्गशिक्षक एस के पाटील,सेवानिवृत्त शिक्षक श्री कुंभार सर हे अगदी बाहेर गावाहून आवर्जून उपस्थित होते.  

           विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक बी एस शिंदे, प्रकाश वाघमोडे, भारत काळे, दिलीप खाडे, शहाजी शिंदे,सहील पवार,बाळासाहेब रास्तेसह सर्व शिक्षक स्टाफ आणि शिक्षकेतर कर्मचारी समारंभासाठी उपस्थित होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर उपस्थित सर्व आजी-माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

       


   त्यानंतर सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपआपला परिचय करून देऊन मनोगताच्या माध्यमातून तात्कालीन शालेय जीवनातील आठवणींना चांगलाच उजाळा दिला.यावेळी सर्व गुरुजन वर्गांचे मनोगत होऊन स्नेहभोजनाचा आस्वाद सर्व उपस्थितांनी घेतला.

          भोजनानंतर फनी गेम्स आणि मनोरंजक कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व माजी विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर च्या कार्यक्रमाचा आनंद घेतला.शेवटी सर्वच विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात फेरफटका मारुन आपल्या तात्कालीन आठवणी जाग्या केल्या.यावेळी दिलीप शिंदे,प्रमोद पवार,प्रशांत शिंदे, विजय शिंदे,शशिकांत शिंदे,संदीप शिंदे,अरविंद शिंदे, प्रशांत शिंदे,सचिन जाधव,धनाजी पवार,प्रकाश रास्ते,शरद जाधव,स्मिता कुलकर्णी,प्राजक्ता कुलकर्णी, शुभांगी शिंदे,शैशवी शिंदे,नंदा देवकर,अस्मिता शिंदे,अनिता शिंदे,अनिता खाडे,ज्योती शिंदे, सुप्रिया शिंदे,चंद्रभागा जाधव, अश्विनी शिंदेसह आजी माजी शिक्षक,शिक्षकोतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले तर आभार प्राजक्ता कुलकर्णी यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top