yuva MAharashtra घोरपडे सरकारांनी आदेश देताच नागज गणातून ताकतीने लढणार.* -- संतोष तुकाराम पाटील.

घोरपडे सरकारांनी आदेश देताच नागज गणातून ताकतीने लढणार.* -- संतोष तुकाराम पाटील.

Admin
0


 द जनसत्ता न्यूज नेटवर्क 

जालिंदर शिंदे 

घाटनांद्रे/वार्ताहर :-

आमच्या सल्लग दोन पिढ्या माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांचा आदेश हा शिरसावंद्य मानून काम करत आहेत.माझे वडील स्व तुकाराम पाटील हे घोरपडे सरकारांनी स्थापन केलेल्या विकास आघाडीचे संस्थापक सदस्य होते.त्यांनीही या आघाडी कडूनच दोन वेळा घाटनांद्रेचे सरपंच व एकदा नागज गणातून पंचायत समितीचे सदस्य म्हणून धुरा सांभाळली होती.आजही या भागात स्व तुकाराम पाटील यांना मानणारा एक मोठा गट आहे.त्यांच्या आग्रहास्तव व घोरपडे सरकारांनी लढण्याचा आदेश देताच आपण अगदी पुर्ण ताकतीने नागज गणातून लढणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते संतोष तुकाराम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.यावेळी त्यांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

            यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की या गणावर कायमस्वरूपी घोरपडे सरकारांचे प्राबल्य राहीले आहे.या गणातील प्रत्येक गावात घोरपडे सरकारांचा मोठा व वजनदार असा गट कार्यरत आहे.त्यातच सरकारांच सुरू आसलेले बेरजेचे राजकारण.यामुळे या गणात निवडून येण्याची आपणास कोणतीही अडचण नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

        स्व तुकाराम पाटील हे घाटनांद्रे गावचे सरपंच व नागज पंचायत समितीचे सदस्य असताना त्यांनी मोठा विकासाचा डोंगरच उभा केला होता.पंचायत समितीची प्रत्येक योजना त्यांनी आपल्या भागात राबविली होती.गावातील शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता.भागातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय याच बरोबर वैयक्तिक कामाचाही डोंगर उभा केला होता.

       आज आम्हीही भागातील विकासात कोणतेही राजकारण न आणता सक्रिय असतो.कार्यकर्त्याची मोठी फळीही पाठिशी आहे.तेव्हा माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांनी आदेश देताच हे मैदान मारणे फार अवघड नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.यावेळी उमेश शिंदे, मधुकर शिंदे,बापूसो शिंदे,गोरख पवार,भारत शिंदे,विशाल शिंदे,राहुल शिंदे,संदीप शिंदेसह कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top