yuva MAharashtra अवघ्या 2500 रुपयांत पार पडलेले लग्न

अवघ्या 2500 रुपयांत पार पडलेले लग्न

Admin
0


 द जनसत्ता न्यूज नेटवर्क 


आजकाल लग्न म्हणजे फक्त भव्य समारंभ, खर्चाचे डोंगर आणि “लोक काय म्हणतील?” या सततच्या धास्तीचा खेळ.

पण कोल्हापूरमधील डॉ. सौरभ तुपकर आणि डॉ. रोहिणी सोळंके यांनी दाखवून दिलं की लग्न म्हणजे पैशाची मोजणी नाही, तर नातं, प्रेम आणि जबाबदारी!

डॉ. सौरभ, MBBS. पदवीधर, राधानगरी कोल्हापूर येथील भूमिअभिलेख कार्यालयात उपअधिक्षक, आणि डॉ. रोहिणी, बीड जिल्ह्यातील माजलगावची कन्या, MBBS. पदवीधर आणि पोलीस उपअधिक्षक, यांनी 5 फेब्रुवारी 2019 रोजी लग्न केलं.

दोघेही सरकारी सेवेत असूनही, या लग्नात ना महागडे कपडे, ना मोठा फोटोग्राफर, ना शेकडो पाहुणे होते. कोणताही फंक्शन हॉल, भव्य डेकोरेशन, बँडबाजा, मेकअप, फोटोसेशन काहीही नव्हतं. फक्त नोंदणी कार्यालयात थेट लग्नाची नोंद झाली, आणि नंतर जवळच्या मित्रमैत्रिणीसह साधं जेवण—एकूण खर्च फक्त 2500 रुपये.

जेवण: 1800 रुपयेपेढे, हार, बुके: 700 रुपये

संदेश फार थेट आहे—“साधं लग्न केल्याने प्रेम कमी होत नाही; पण दिखावा वाढल्यास नात्याचा खरा अर्थ हरवतो.”

कोल्हापूरचे हे जोडपे दाखवते की सुखी वैवाहिक जीवनासाठी पैसा नव्हे, विचार आणि जबाबदारी महत्वाची आहे.

साधेपणातही सौंदर्य, समाधान आणि आदर्श असतो, ज्याचा आदर्श आजच्या युवा पिढीसाठी उदाहरण ठरतो.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top