राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज मंडलाचा शताब्दी वर्ष विजयादशमी उत्सवाचे आयोजन
कवठेमहांकाळ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५:०० वा. श्री हनुमान मंदिर परिसरात विजयादशमी उत्सव व शश्त्रपूजानाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मा. विजय राव गावडे (सामाजिक समरसता गतीविधी, प्रांत सदस्य मंडळ) मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून मा. बबनतराव पिराजी पाटील (माजी शांती सैनिक, इस्त्राईल-गाझापट्टी, माजी सरपंच रायवाडी, माजी संचालक दूध संघ कवठेमहांकाळ) उपस्थित राहणार आहेत.
तसेच रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ५.०० वाजता कवठेमहांकाळ येथे शताब्दी वर्ष संचलन आयोजित करण्यात आले आहे.
या पवित्र कार्यात तालुक्यातील सर्व स्वयंसेवक, नागरिक, मातृशक्ती व बंधुभगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मंडल नागज व तालुका कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.