yuva MAharashtra पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचे कवठेमहांकाळत जोरदार स्वागत..*

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचे कवठेमहांकाळत जोरदार स्वागत..*

Admin
0


सांगली न्यूज 

कवठेमहांकाळ/प्रतिनिधी 


*फटाक्यांच्या आतषबाजीत कोकळे, आलकुड (एस) इरळी, ढालगाव, आरेवाडी, नागोळेत केले स्वागत आणि अभिवादन केले..!
समाज प्रबोधन समाज जागृतीच्या उद्देशाने सांगली जिल्ह्यात सर्वत्र जात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचे कवठेमहांकाळ तालुक्यात व कवठेमहांकाळ शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या पुढाकाराने आणि राज्याचे युवा नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चिमणभाऊ डांगे यांचे नेतृत्वाखाली ही संदेश यात्रा सुरू आहे या यात्रेत महासंघाचे महापौर संगीताताई खोत, जिल्हाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य संजय (दादा) पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके, जत तालुका युवा नेते शंकरराव वगरे,हे संदेश यात्रेचे साथी बनले. 
         या संदेश यात्रेचे कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे गावात आगमन होताच या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.यावेळी कोकळे गावचे लोकनियुक्त सरपंच मा.विजयभाऊ तोडकर, करलहट्टी गावचे लोकनियुक्त सरपंच मा.मच्छिंद्र हजारे,बासाप्पावाडीचे सरपंच  मा.गटुभाऊ ओलेकर, सोसायटीचे चेअरमन सचिन पाटील,माजी व्हाईस चेअरमन देमाजी ओलेकर, जेष्ठ नागरिक दिलीप (आण्णा) ओलेकर, ओबीसी संघटनेचे नेते सलिम शेख या मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून स्वागत केले यावेळी कोकळे गावातील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक पदाधिकारी तसेच कोकळे , करलहट्टी बसाप्पाचीवाडी गावातील ग्रामस्थ व माता भगिनी उपस्थित होते.तसेच आलकुड (एस), इरळी,ढालगाव,
आरेवाडी, नांगोळे, तेथे सुध्दा मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.
       कवठेमहांकाळ शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रा दाखल होताच या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेचे जयघोषाच्या घोषणा देत फटाक्यांच्या आतषबाजीत सर्व समाजबांधवांनी जोरदार स्वागत केले.
 यावेळी कवठेमहांकळ नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सिंधुताई गावडे, माजी सभापती अजितदादा कारंडे,ऑड नंदकुमार बंडगर, शिवाजीराव गावडे, गणपती मासाळ,ऑड पाटोळे, गिरीश शेजाळ,यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी प्रा.शिवाजी ओलेकर, सुर्यकांत ओलेकर,विजय गडदे,संजय गडदे, विजय शेजाळ,
मोहन कारंडे,शुभम कारंडे,प्रा.रामचंद्र दुधाळ, सुखदेव पाटील,
कवठेमहांकळ शहरासह परिसरातील ग्रामस्थ व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
13 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या स्थिती व तारखेप्रमाणे च्या दोन तारका दरम्यान ही संदेश यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात नेण्यात आली शिराळा तालुक्यातील मोरणीच्या बिरोबा देवालयापासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारंभ सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक स्थळी होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजे मल्हारराव होळकर आणि धनगर समाजाचा समग्र क्रांतिकारी इतिहास सर्वांना माहीत व्हावा धनगर समाजाची सत्यस्थितीचे सर्वांना आकलन व्हावे सर्व समाज बांधवांची धनगर समाज बांधवांचा सुसंवाद साधला जावा समाजाचे प्रबोधन आणि समाज जागृतीच्या माध्यमातून समाजाचे संघटना जागृती व्हावी या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या अवचित्ताने ही संदेश यात्रा काढल्याचे ऍड चिमण भाऊ डांगे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top