सांगली न्यूज/कवठेमहांकाळ
ही शेतकरी व कृषी अधिकारी, कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
सीईओ धोडमिसे म्हणाल्या की शेतकऱ्यानी अवलंबलेले तंत्रज्ञान व त्यांनी शेतीची केलेली सुधारणा इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न कृषी विभागाने करावेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग व्हिडिओ बनवून जिल्हा परिषद पोर्टलच्या माध्यमातून प्रसिद्ध करून इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जातील.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल म्हणाले की परंपरागत शेती न करता व्यवसायिक दृष्टिकोन ठेवून करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचे जीवन सुखी होण्यास मदत होईल. तसेच शेती माध्यमातून मिळणारे उत्पन्नाचे पुनर्रगुंतवणुकीवर भर द्यावा. सध्या चांगल्या दर्जाचे शेती उत्पादन बाजारात उपलब्ध असेल ते घ्यायला आम्ही सर्वजण तयार आहोत, त्यामुळे शेतकरी बांधवांनी यावर विचार करून शेतमाल पिकवल्यास चांगले उत्पन्न मिळते.
गटाच्या माध्यमातून शेतीला गती प्राप्त करून दिली पाहिजे असे मत मनोजकुमार वेताळ यांनी केले. शेतीला किती कर्जाची गरज असून त्याच्या व्याजदराचा अभ्यास करावा. शेतीत काय गुंतवणूक केली पाहिजे व काय उत्पन्न मिळते या गणितावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच शेतकरी स्मार्ट बनले पाहिजेत.
महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग कडून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पिक स्पर्धा सन 2022-23 *महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक विजेते* (मका पीक) अग्रण धुळगावचे प्रगतशील युवा शेतकरी शिवश्री. रमेश संभाजी खंडागळे व त्याच्या पत्नी सौ. रुपाली रमेश खंडागळे यांचा जिल्हा परिषद, सांगली येथे सन्मान करण्यात आला. यावेळी अग्रण धुळगावचे सरपंच शिवदास भोसले स्वतः उपस्थित होते 🌹💐
2020 पासून सातत्याने सहकुटुंब व स्वतःच्या जिद्द, चिकाटीने केलेल्या प्रयत्नांती आणि अग्रण धुळगावचे आदर्श कृषि सहायक श्री. गजानन अजेटराव साहेबांच्या तसेच वेताळ साहेबांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली *मका पिकात एकरी 71.39 क्विंटल* इतके विक्रमी उत्पादन घेतले असून त्यांच्या या घवघवीत यशाचे सर्वानी तोंडभरून कौतुक केलं. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, राजगीरा, राळा यासारख्या अनेक पिकांमध्ये उल्लेखनीय गौरवशाली कार्याबद्दल तसेच जिल्ह्यातील शेतकरी बंधूंमधून रमेश यांची *रिसोर्स बँक शेतकरी* म्हणून निवड करण्यात आली आहे.
रमेश यांनी शेतकरी मनोगत व्यक्त करताना शेतीतील नाविन्यपूर्ण व यशस्वी प्रयोग करून स्वतःची ओळख कशी निर्माण केली आहे, हे चित्रफितीतुन सर्वांना दाखवून दिले. सर्व जिल्ह्यातील शेतकरी बंधूनी आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतीला प्राधान्य दिले पाहिजे असा आवर्जून उल्लेख केला.