शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या बाबत दिले तहसीलदारांना निवेदन........
सांगली न्यूज / कवठेमहांकाळ
धनवान भारत पार्टीच्या कवठेहांकाळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांबाबत तहसीलदार यांना शुक्रवार दि.12 जानेवारी निवेदन दिले.
दुष्काळाची दाहकता पाहता शासन निर्णयाचा अनादर करणाऱ्या व शेतकऱ्यांना मानसिक त्रास देण्यासाठी संस्थेच्या पैशाचा अपव्य करणाऱ्यां, अधिकाऱ्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी कवठेमंहाकाळ तालुक्यामध्ये दोन्ही बांधकाम विभागामार्फत तसेच शासनाच्या विविध विभागामार्फत सुरू असणाऱ्या शासकीय कामांचा दर्जा योग्य राखण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात,विकास कामांच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांनवर निलंबनाची कार्यवाही करावी.सध्या तालुक्यामध्ये असणाऱ्या दुष्काळ परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना शेतीमाल पिकवण्यासाठी योग्य त्या दाबाने विजेचा पुरवठा करावा आवश्यक असल्यास जनित्रांची एचपी वाढवून द्यावा शेतकऱ्यांच्या बाबतीतील शासन निर्णयांचे जलद गतीने निपटारा होऊन कार्यवाही व्हावी.केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प पेजल योजनां सक्षम रीतीने सुरळीत कराव्यात,आजारी व बंद पडलेल्या जलस्वराज्य राष्ट्रीय पेयजल योजना सारख्या योजनांना सक्षम कराव्यात नादुरुस्त योजना सुरू कराव्यात, नागरिकांना पाणी पुरवठा योजना डबघाईला आणणाऱ्या दोषी पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी. तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना शासन निर्णयाप्रमाणे पाण्याचे वाटप व्हावे.तालुक्यातील आरोग्य सुविधा दर्जेदार करावी, संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्त सज्जाच्या ठिकाणी राहण्याची शासन निर्णयाचे योग्य रीतीने पालन करावे योग्य ते निर्देश देण्यात यावेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ मिळावी तसेच दूध उत्पादकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी दूध उत्पादकांच्या घामाचा योग्य दाम द्यावा अशा बारा मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या वतीने निवडणूक नायब तहसिलदार रावसाहेब चाटे यांनी स्वीकारले. त्यावेळी धनवान भारत पार्टीचे तालुका अध्यक्ष तानाजीराव शिंगाडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य आबासाहेब वावरे, संघटक सचिन लाटवडे, सांगली जिल्हा संघटक अभयसिंह सूर्यवंशी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या सह्या या निवेदनावर आहेत.
मागण्या मान्य न झाल्यास धनवान भारत पार्टीच्या वतीने सवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी तालुक्यातील पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.


