सांगली न्यूज
कवठेमहांकाळ: शहरात बुधवार दिनांक २४ जानेवारी रोजी विद्यानगर येथील आदर्श विद्यानिकेतन येथे राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास महिला राष्ट्रवादी आघाडीच्या कवठे महांकाळ शहराध्यक्षा मीनाक्षी माने आणि डॉ.हर्षला कदम यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
देशातील मुलींना भेडसावणाऱ्या सर्व असमानते बाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवणे,मुलींच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवणे,मुलींचे शिक्षण,आरोग्य आणि पोषण याविषयी जागरूकता निर्माण करणे,मुली आणि महिलांवरील गुन्ह्यांपासून त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांच्यासमोरील आव्हानांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे या उद्देशाने राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जात असल्याचे मत प्रमुख पाहुणे मीनाक्षी माने आणि डॉ. हर्षला कदम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.मुख्याध्यापिका विद्या कुंभार यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थिनी यांचे स्वागत केले.भाग्यश्री सपकाळ यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.विहारा विनोद कांबळे ही विद्यार्थीनी,'स्त्री भ्रूणहत्या' यावर एकांकिका सादर करत एकांकिका स्पर्धेची विजेती ठरली.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्या नंदकुमार कुंभार,सुप्रिया घनश्याम कुलकर्णी,रागिणी महेश जाधव,भाग्यश्री राहुल सपकाळ,स्मिता सुनील ननवरे,रुपाली नितीन लोंढे,काजल विकास चंदनशिवे,मनीषा विजय घुले,जयश्री दयानंद वाघमारे यांनी केले होते.शेवटी सुप्रिया कुलकर्णी यांनी आभार मानले आणि या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


