yuva MAharashtra भागीरथीआई इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये भरला चिमुकल्यांचा आठवडी बाजार*

भागीरथीआई इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये भरला चिमुकल्यांचा आठवडी बाजार*

Admin
0
भागीरथीआई इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये भरला चिमुकल्यांचा आठवडी बाजार


सांगली न्यूज : सचिन गायकवाड

कवठे महांकाळ : तालुक्यातील शिरढोण येथील मा.आर.आर.(आबा) पाटील बहूउद्देशिय समाजसेवा संस्था संचलित भागिरथीआई इंग्लिश मिडीयम स्कूल मधील चिमुकल्यांच्या आठवडी बाजारास तसेच खाद्य पदार्थ महोत्सवास स्थानिक नागरीक,पालकांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली.लहान मुलांना लहान वयातच व्यावहारिक ज्ञान व्यवहारातूनच मिळावे या उदात्त हेतून शालेय व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक व सहशिक्षक यांनी नेहमीप्रमाणेच आगळावेगळा उपक्रम शाळेच्या प्रांगणात भरविला होता.
   
        या बाजाराची उलाढाल रुपये दहा हजारपेक्षा अधिक झाली असून मुलांमध्ये आम्ही स्वतः आर्थिक व्यवहार केल्याचे समाधान दिसून आले.नागरिकांनी भाजीपाला,दैनंदिन जीवनातील लागणारा मसाला,खाद्यपदार्थ,फळे खरेदी करताना तडजोड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मुलांना या वस्तूची किंमत किती,किती रुपयांना ती विकली पाहिजे हे धडे देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात देण्याचे काम या आठवडा बाजारात केल्याचे दिसून आले. 
          या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आर्थिक देवाण-घेवाण,मोजमाप, तसेच लहान वयात भाजीपाला बाजाराचे ज्ञान असणे आवश्यक असणे गरजेचे असल्याने व बाजारात आलेल्या ग्राहकांशी सुसंवाद कसा साधावा यासाठी हा आठवडा बाजार भरविला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिली.या आगळ्यावेगळ्या उपक्रमास राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कवठे महांकाळ शहराध्यक्षा मीनाक्षी माने,सरपंच शारदा पाटील,डॉक्टर प्रवीण कदम,संस्थापक शंकर चव्हाण,संस्थापिका सुलोचना चव्हाण,सचिव प्रगती चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.


           या आठवडी बाजारासाठी चिमुकल्यांना मार्गदर्शन चंद्रकला भोसले,वैशाली शिंदे,मंदा पवार तसेच इतर शिक्षक,शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.शहाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले तर मोहसीन मुलाणी यांनी शेवटी आभार मानले आणि या उपक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top